ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी, म्हणाला हे 2 भारतीय खेळाडू मोडू शकतात 400 रनचा रेकॉर्ड

वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ब्रायन लारा त्याच्या आक्रमक खेळीमुळे प्रसिद्ध होता. त्याच्या समोर गोलंदाजी करताना अनेकांना भीती वाटायची. लाराच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ४०० धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. हा रेकॉर्ड अजून कोणीच मोडू शकलेला नाही. लाराच्या मते हे दोन खेळाडू रेकॉर्ड मोडू शकतात.

ब्रायन लाराची मोठी भविष्यवाणी, म्हणाला हे 2 भारतीय खेळाडू मोडू शकतात 400 रनचा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 8:53 PM

भारतीय क्रिकेट संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यादरम्यान वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा याने मोठी भविष्यवाणी केली आहे. या महान क्रिकेटपटूने सांगितले की, असे कोणते दोन खेळाडू आहेत जे कसोटीत त्याचा 400 धावांचा विक्रम मोडू शकतात. त्याने जी नावे सांगितली आहेत ते दोन्हीही भारतीय संघाचे खेळाडू आहेत. लाराने 12 एप्रिल 2004 रोजी इंग्लंडविरुद्ध 400* धावांची इनिंग खेळून रेकॉर्ड केला होता. हा विक्रम अजून कोणीच मोडू शकलेला नाही.

300 चा टप्पा ओलांडणारे खेळाडू

आपल्या या विक्रमाबद्दल बोलताना ब्रायन लारा म्हणाला की, वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, सनथ जयसूर्या यासारख्या अनेक दिग्गजांनी त्याच्या विक्रमाला आव्हान दिले होते. “माझ्या काळात असे खेळाडू होते ज्यांनी या विक्रमाला आव्हान दिले होते किंवा किमान 300 चा टप्पा ओलांडला होता. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, ख्रिस गेल, इंझमाम-उल-हक, सनथ जयसूर्या यांचा समावेश होता. ते सर्व अतिशय आक्रमक खेळाडू होते. .”

400 चा रेकॉर्ड कोण मोडणार

लारा म्हणाला की, “आज तुमच्याकडे किती आक्रमक खेळाडू आहेत? विशेषतः जॅक क्रॉली आणि हॅरी ब्रूक हे इंग्लंड संघात आहेत. कदाचित भारतीय संघात यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आहेत. त्यांना योग्य परिस्थिती मिळाल्यास ते विक्रम मोडू शकतात.” शुभमन गिलच्या कसोटीतील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 25 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 46 डावात 35.52 च्या सरासरीने आणि 59.37 च्या स्ट्राईक रेटने 1492 धावा केल्या आहेत. कसोटीत 6 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत.

यशस्वी जैस्वालने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 16 डावात 68.53 च्या सरासरीने आणि 70.07 च्या स्ट्राईक रेटने 1028 धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 4 अर्धशतके आणि 3 शतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 214 आहे.

मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....