बुमराहची पत्नी ही आहे करोडोंची मालकीन, अशी केली होती करिअरची सुरुवात
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपल्या धारदार गोलंदाजीने अनेक मोठ्या खेळाडूंना माघारी पाठवले आहे. बुमराहने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत मोठं यश मिळवलं आहे. नुकताच त्याने पत्नीसोबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्याची पत्नी कोण आहे जाणून घ्या.
अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी२० वर्ल्जकपचे विजेतेपद भारताने पटकावले आहे. T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलंय. टीम इंडियाने 17 वर्षांनंतर या कपवर पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं आहे. चॅम्पियन टीमवर सगळ्याच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. बुमराहने (jusprit bumrah) त्याच्या कारकिर्दीत खूप मोठे यश मिळवले आहे. क्रिकेट कारकिर्दीसोबतच बुमराहने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आणि आर्थिक परिस्थितीतही यश मिळवले आहे. बुमराहने फायनल सामन्यात बोलत असताना अँकर आणि त्याची पत्नी संजनाला मिठी मारली होती.
बुमराहची वर्षाला कमाई किती?
बमराह स्वतः करोडोंची कमाई करत नाही तर त्याची पत्नी संजना गणेशन देखील वर्षाला करोडो रुपये कमावते. जसप्रीत बुमराह BCCI च्या A+ श्रेणीतील खेळाडूंमध्ये येतो. त्यासाठी त्याला बीसीसीआय वर्षाला ७ कोटी रुपये मानधन म्हणून देते. याशिवाय बुमराह आयपीएलमधूनही करोडोंची कमाई करतो.
बुमराहने 15 मार्च 2021 रोजी संजना गणेशनसोबत लग्न केले. सध्या दोघांना एक मुलगाही आहे. बुमराह-संजनाच्या लग्नाला फक्त त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहू शकले होते.
कोण आहे संजना गणेशन
संजना गणेशन हे देखील क्रीडाविश्वातील एक अतिशय यशस्वी नाव आहे. बुमराहप्रमाणेच त्याची पत्नी संजनाची कारकीर्दही खूप यशस्वी ठरली आहे. संजनाने पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेकचे शिक्षण घेतले आहे. इथून ती गोल्ड मेडलीस्ट देखील आहे.
संजना गणेशन ही एका आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. मात्र, प्रसिद्धीच्या झोतात येण्याच्या इच्छेने तिने या क्षेत्राला अलविदा म्हटले आणि 2014 मध्ये संजनाने एमटीव्हीवरील एका रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला.
यानंतर तिने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कमधून क्रीडा पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. या काळात तिने आयसीसी विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक यासह अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळांत अँकरिंग केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजना गणेशनची एकूण संपत्ती 8 कोटी रुपये आहे.