Mumbai Indians च टेन्शन वाढवणारी बातमी, कॅमरुन ग्रीनला IPL Auction मध्ये 17.5 कोटीला घेतलय विकत
IPL Auction: मुंबई इंडियन्सची चिंता वाढवणारी ती बातमी काय आहे? कॅमरुन ग्रीन हा IPL इतिहासातला दुसरा महागडा खेळाडू आहे.
मेलबर्न: इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या मिनी ऑक्शनमध्ये कॅमरुन ग्रीनला मोठा भाव मिळाला. त्याला मोठया किंमतीला विकत घेतलं. 23 डिसेंबरला झालेल्या या ऑक्शनमध्ये 17.5 कोटी रुपये किंमतीला ग्रीनला मुंबई इंडियन्सने विकत घेतले. ग्रीनला इतकी किंमत मिळणार, याचा आधीपासूनच अंदाज होता. आयपीएलच्या इतिहासातील तो दुसरा महागडा खेळाडू आहे. आता कॅमरुन ग्रीनच्या चाहत्यासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.
वेदनेने कळवळत होता
बॉक्सिंग डे च्या दुसऱ्यादिवशी कॅमरुन ग्रीनला दुखापत झालीय. एनरिक नॉर्खियाचा एक वेगवान चेंडू त्याच्या बोटांना लागला. ग्रीन अक्षरक्ष: वेदनेने कळवळत होता. ग्रीनने आपले ग्लोव्हज काढले, त्यावेळी त्याच्या बोटांमधून रक्त येत होतं. ग्रीनला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याला लगेच स्कॅनसाठी पाठवण्यात आलं.
लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं
ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅमरुन ग्रीनला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरुन थेट रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्या बोटांच स्कॅनिंग होणार आहे. कदाचित तो या कसोटी सामन्यात पुढे खेळणार नाही. कारण त्याची दुखापत गंभीर दिसतेय.
Cameron Green is forced to retire hurt after this nasty blow on the glove #AUSvSA pic.twitter.com/Q7zY4zUkPW
— 7Cricket (@7Cricket) December 27, 2022
त्या बॉलचा वेग काय होता?
इनिंगच्या 85 व्या ओव्हरमध्ये कॅमरुन ग्रीनला दुखापत झाली. त्याच्यासमोर वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया बॉलिंग करत होता. नॉर्खियाने पाचवा शॉर्ट चेंडू टाकला. तो थेट शरीरवेधी चेंडू ठरला. ग्रीनने चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला. पण अचानक बॉल एक्स्ट्रा बाऊन्स झाला. त्यामुळे चेंडू बॅटऐवजी ग्लोव्हजला लागला. ग्रीनने ग्लोव्हज काढले, त्यावेळी त्याच्या बोटातून भळाभळा रक्त वाहत होतं. ग्रीनला ज्या चेंडूवर दुखापत झाली, तो 144.6 किमी प्रतितास वेगाने टाकला होता. पहिल्या डावात ग्रीनच शानदार प्रदर्शन
कॅमरुन ग्रीन भले 6 रन्स या व्यक्तीगत धावसंख्येवर रिटायर्ड हर्ट झाला. पण त्याने पहिल्या डावात आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. ग्रीनने पहिल्या इनिंगमध्ये 27 धावा देऊन 5 विकेट काढल्या. ग्रीनसाठी मागचा आठवडाही खूप चांगला होता. या खेळाडूला मुंबई इंडियन्सने 17.5 कोटी रुपये किंमतीला विकत घेतलं.