Rohit Sharma IND vs WI: …म्हणून मैदानावरच रोहित शर्मा अंपायरवर भडकला, पहा VIDEO

Rohit Sharma IND vs WI: . भारताने हा सामना जिंकला असला, तरी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) मैदानावरील पंचांच्या एका निर्णयावर नाराज झाला.

Rohit Sharma IND vs WI: ...म्हणून मैदानावरच रोहित शर्मा अंपायरवर भडकला, पहा VIDEO
Follow us
| Updated on: Feb 17, 2022 | 2:37 PM

कोलकाता: इडन गार्डन्स (Eden gardens) स्टेडियमवर काल झालेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर (India va West indies) सहा विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन टी 20 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने हा सामना जिंकला असला, तरी कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) मैदानावरील पंचांच्या एका निर्णयावर नाराज झाला. रोहित शर्माची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. DRS घेण्याच्या निर्णयावरुनही कनफ्युजन असताना रोहितने पुन्हा एकदा विराट कोहलीचं लगेच ऐकल्याचं दिसून आलं. वनडे प्रमाणे भारताने टी 20 सीरीजची चांगली सुरुवात केली आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या वेस्ट इंडिजचा हा सलग चौथा पराभव आहे. आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या रवी बिश्नोईने या सामन्यात दमदार कामगिरी केली.

नेमकं काय घडलं?

सामन्याचं सातव षटक सुरु होतं. टी 20 मध्ये भारतासाठी डेब्यु करणारा रवी बिश्नोई गोलंदाजी करत होता. समोर रॉस्टन चेस होता. बिश्नोईने त्याच्या पहिल्या षटकात तीन वाईड बॉल टाकले. रोहितने रिव्ह्यू घेतला नसता, तर तो चौथा वाईड बॉल ठरला असता. बिश्नोईने पहिल्या षटकातील पाचवा चेंडू गुगली टाकला. रॉस्टनने लेग साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पॅडला लागून विकेटकिपर पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला. आवाज झाल्यामुळे बिश्नोईने झेलबादचे अपील केले. पण पंचांनी वाईड बॉल दिला. त्यावर रोहितने ‘वाईड बॉल कुठे देतो यार’ असं म्हटलं. रोहित पंचांच्या या निर्णयावर वैतागल्याचं त्याच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसत होतं. चेंडू रॉस्टन चेसच्या खूप जवळून गेल्यामुळे आवाज झाला होता. स्टंम्पसमधल्या मायक्रोफोनमुळे रोहित जे बोलला ते सर्वांना ऐकू आलं.

रोहितने बिश्नोई, पंत आणि विराट बरोबर चर्चा केली. DRS घेण्यावरुन थोडा गोंधळ दिसत होता, अखेर विराटच ऐकून रोहितने DRS घेतला. रिप्लेमध्ये चेंडू चेसच्या पॅडला लागल्याचे दिसत होते. पण बॅटला स्पर्श झाला नव्हता. पंचांनी नाबादचा निर्णय कायम ठेवला. पण वाईडचा निर्णय बदलला. .चेसचे पायही क्रीझमध्ये होते.

Captain Rohit Sharma Slammed The On Field Umpire For Wrong Wide Call watch video

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.