IND vs NZ: रोहित शर्माने डगआउटमध्ये जखमी मोहम्मद सिराजला मारलं, VIDEO व्हायरल
भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने बुधवारी न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर 165 धावांचे आव्हान उभे केले होते. भारताने हे लक्ष्य दोन चेंडू आणि पाच गडी राखून पूर्ण केले. यासह रोहित शर्माने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली आहे. भारताच्या T20 संघाचा नवा कर्णधार म्हणून रोहितची नियुक्ती करण्यात आली आहे. सामन्यादरम्यान मात्र रोहितने डगआऊटमध्ये बसलेल्या आपल्या एका सहकाऱ्यावर गंमतीने हात उचलला. मोहम्मद सिराज असे या खेळाडूचे नाव आहे. (captain Rohit Sharma slap Mohammed Siraj in first T20 against New Zealand)
या सामन्यात सिराजला दुखापत झाली होती. शेवटचे षटक टाकणाऱ्या सिराजला पहिल्याच चेंडूवर बोटाला दुखापत झाली. सिराजने चेंडू टाकला आणि फलंदाज मिचेल सँटनरने स्ट्रेट फटका मारला. सिराजने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली. फिजिओने मैदानावर येऊन सिराजवर उपचार केले. सिराजने पुन्हा ते षटक पूर्ण केले.
यानंतर सिराज आणि रोहित डगआऊटमध्ये बसले असताना रोहितने मस्करीत सिराजच्या डोक्यावर टपली मारली. रोहित, केएल राहुल आणि सिराज त्यांच्या डावीकडे काहीतरी पाहात होते, शक्यतो रिप्ले पाहात असावेत. यानंतर राहुलने रोहितकडे पाहिले आणि रोहितने हसून सिराजच्या डोक्यावर टपली मारली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या सामन्यात सिराजने चार षटकात 39 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.
Why did Rohit hit Siraj???#INDvNZ #RohitSharma pic.twitter.com/EjqnUXts3v
— Bhanu? (@its_mebhanu) November 17, 2021
असा पार पडला सामना
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यानंतर न्यूझीलंडने 164 धावा केल्या. भारताने या धावांचा पाठलाग करताना सुरुवातीपासून चांगला खेळ दाखवला. सूर्यकुमार आणि रोहितने उत्तम खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं. रोहितने 36 चेंडूक 48 धावा केल्या. तर सूर्यकुमारने सर्वाधिक 40 चेंडूत 62 धावा केल्या. पण सूर्यकुमार बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर दोघेही झटपट बाद झाले. ज्यामुळे अखेरच्या अखेरच्या 3 चेंडूत भारताला विजयासाठी 3 धावांची गरज होती. अशा वेळी आक्रमक फलंदाज ऋषभ पंतने चौकार लगावत सामन्यात विजय मिळवला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 टी-20 सामने खेळवले जाणार असून यातील पहिला सामना भारताने जिंकल्याने भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. यानंतर पुढील दोन सामन्यानंतर उभय संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.
इतर बातम्या
T20 World Cup 2021 मध्ये भारतीय संघात स्थान न मिळालेल्या चहलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
ICC कडून सौरव गांगुलीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, क्रिकेटशी संबंधित नियम-कायदे बनवणार
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार? क्रीडा मंत्र्यांची सावध प्रतिक्रिया
(captain Rohit Sharma slap Mohammed Siraj in first T20 against New Zealand)