Lanka premier league: क्रिकेट मॅचच्या 3 दिवस आधी दात तुटले, 30 टाके पडले, पण तरीही टीमला मिळवून दिला विजय

Lanka premier league: कोण आहे हा जिगरबाज क्रिकेटर?

Lanka premier league: क्रिकेट मॅचच्या 3 दिवस आधी दात तुटले, 30 टाके पडले, पण तरीही टीमला मिळवून दिला विजय
TwitterImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 11, 2022 | 11:31 AM

Lanka Premier League मध्ये कँडी फालकन्सने जाफना किंग्सला हरवलं. 10 डिसेंबरला संध्याकाळी हा सामना झाला. 3 दिवसापूर्वीच एका खेळाडूचे दात तुटले होते, तो कँडी फालकन्सच्या विजयाचा हिरो ठरला. 7 नोव्हेंबरला लंका प्रीमियर लीगमध्ये एक मॅच झाली. त्या सामन्यात कॅच पकडताना या खेळाडूचे दात तुटले होते. त्याला मैदानातून थेट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं. या प्लेयरच नाव आहे, चामिका करुणारत्ने. या घटनेनंतर चामिका करुणारत्ने पुन्हा मैदानात उतरला, व त्याने टीमला विजय मिळवून दिला.

शेवटच्या चेंडूवर विजयी

चामिका करुणारत्नेने टीमच्या विजयात बॅटिंग आणि फिल्डिंग दोन्ही बाजूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. जाफना किंग्सने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 147 धावा केल्या. प्रत्युत्तरात कँडी फालकन्सची टीम शेवटच्या चेंडूवर 3 विकेटन्सनी जिंकली.

चामिकामुळे जिंकला सामना

148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कँडी फालकन्सच्या 100 धावात 6 विकेट गेल्या होत्या. टीमवर पराभवाच सावट होतं. पण त्यानंतर 7 व्या क्रमांकावर चामिका करुणारत्ने फलंदाजीसाठी उतरला. त्याने टीमला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला.

चामिकाने 162.50 च्या स्ट्राइक रेटने 16 चेंडूत 26 धावा केल्या. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याने इनिंगमध्ये 2 चौकार आणि 2 षटकार लगावले. चामिकाच्या या इनिंगच्या बळावर कँडी फालकन्सने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला.

बॅटशिवाय फिल्डिंगमध्येही कमाल

चामिका करुणारत्नेने फक्त बॅटिंगच नाही, फिल्डिंगमध्येही कमाल केली. त्याने जाफना किंग्स विरुद्धच्या सामन्यात 2 महत्त्वाचे झेल पकडले. त्यामुळे जाफनाची टीम 150 पेक्षा जास्त धावा करु शकली नाही.

जाफना किंग्सकडून अविष्का फर्नांडो यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 31 धावा केल्या. पाकिस्तानच्या शोएब मलिकने 28 धावा केल्या. चामिकानेच शोएबची कॅच पकडली. त्याशिवाय 20 धावा करणाऱ्या ड्यूनिथची कॅच सुद्धा चामिका करुणारत्नेने पकडली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.