धोनीमुळे CSK बनला मोठा ब्रँड, मार्केट कॅपिटल मुल्य 7600 कोटी, एका शेअरची किंमतच….

महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने (Chennai Super Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा ऑक्शनआधी कमाल केली आहे.

धोनीमुळे CSK बनला मोठा ब्रँड, मार्केट कॅपिटल मुल्य 7600 कोटी, एका शेअरची किंमतच....
CSK Team (Photo: IPL)
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 1:10 PM

चेन्नई: महेंद्र सिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने (Chennai Super Kings) आयपीएल 2022 (IPL 2022) मेगा ऑक्शनआधी कमाल केली आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेली चेन्नई सुपर किंग्ज देशातील पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न टीम बनली आहे. CSK चं मार्केट कॅप 7600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. ग्रे मार्केटमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या शेअरची किंमत 210 ते 225 रुपये आहे. चेन्नई सुपर किंग्जचा मालकी हक्क इंडिया सीमेंट्स जवळ आहे. पण वैशिष्टय असं आहे की, मार्केट कॅपिटलमध्ये CSK ने इंडिया सीमेंट्सला पाठी सोडलं आहे. 28 जानेवारीला बाजार बंद होताना इंडिया सीमेंट्सचं मार्केट कॅप 6869 कोटी रुपये होतं.

दोन कारणांमुळे वाढलं चेन्नई सुपर किंग्जच मार्केट कॅपिटल मुल्य धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच मार्केट कॅपिटल मुल्य वाढण्यामागे प्रामुख्याने दोन कारण आहेत. या टीमने 2021 मध्ये चौथ्यांदा आयपीएलच जेतेपद मिळवलं. त्यानंतर आयपीएलमध्ये दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. या दोन्ही संघांना मोठ्या किंमतीला विकत घेण्यात आलं. याचाच अर्थ आयपीएल ब्रॅण्डवरील विश्वास वाढला आहे. “सीएसकेचा ब्रँड इंडिया सीमेंट्सच्या ब्रँडच्या पुढे निघून जाईल” असे इंडिया सीमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन म्हणाले.

एका शेयरचे मुल्य 110-120 रुपयावरुन…. 26 ऑक्टोंबर 2021 रोजी सीएसकेला कंट्रोल करणारी कंपनी चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेडचे शेअर्स अनलिस्टेड मार्केटमध्ये सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. त्यावेळी एका शेयरचे मुल्य 110-120 रुपयावरुन 220 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले होते. CSKCL मार्केट कॅपिटल 7 हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यावेळी यूनिकॉर्न क्लबपासून चेन्नईची टीम फक्त 500 कोटी रुपये लांब होती. आयपीएल 2021 फायनल नंतर फक्त 11 दिवसात हे घडलं होतं. चेन्नई सुपर किंग्ज आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे. 2008 ते 2021 च्या आयपीएल सीजनमध्ये चेन्नईचा संघ फक्त 2020 चा सीजन सोडल्यास दरवेळी प्लेऑफ म्हणजे सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटाकवलं आहे.

chennai super kings indias1st sports unicorn india cements ms dhoni ipl 2022 market capital 7600 crore

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.