CSK vs PBKS, Live Score, IPL 2022: चेन्नईची पराभवाची हॅट्ट्रिक, पंजाबचा 54 धावांनी मोठा विजय
Chennai super kings vs Punjab kings Live Score in Marathi: पंजाबने आपला पहिला सामना जिंकला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्यांचा पराभव झाला.
CSK vs PBKS, IPL 2022: मुंबई: आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) खूप खराब कामगिरी करत आहे. मागच्या 12 सीजनपेक्षाही वाईट कामगिरी चेन्नई या सीजनमध्ये करतेय. आज पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात चेन्नईने पराभवाची हॅट्ट्रिक केली. सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि आज पंजाब किंग्सने CSK चा पराभव केला. मागच्या सामन्याच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीत सुधारणा दिसली. पण फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात निराशाजनक प्रदर्शन कायम होतं. अंबाती रायुडूने आजचा स्टार लियाम लिविंगस्टोनचा एक सोपा झेल सोडला. चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात आटोपला. पंजाबने 54 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. चेन्नईकडून फक्त शिवन दुबेने सर्वाधिक (57) धावांची खेळी केली.
Key Events
चेन्नई आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. मागच्या दोन सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला आहे.
पंजाब किंग्सचा एका सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे.
LIVE Cricket Score & Updates
-
पंजाबचा 54 धावांनी मोठा विजय
पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सवर 54 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. पंजाबच्या 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव 126 धावात आटोपला.
Our mood right now… ?#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #CSKvPBKS pic.twitter.com/43fC8U0Gcf
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
धोनी बाद झाला आहे
धोनी बाद झाला आहे. राहुल चाहरच्या गोलंदाजीवर विकेटकिपर शर्माने त्याचा झेल घेतला. धोनीने 23 धावा केल्या. चेन्नईची स्थिती नऊ बाद 125 आहे.
-
-
चेन्नई पराभवाच्या दिशेने
17 षटकात चेन्नईच्या आठ बाद 121 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 57 धावांची तुफान खेळी करुन आऊट झाला. त्यानंतर ड्वेन ब्राव्हो आणि प्रिटोरियस स्वस्तात आऊट झाले.
-
CSK च्या शिवम दुबेची हाफ सेंच्युरी
CSK च्या शिवम दुबेने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली. त्याने 26 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत पाच चौकार आणि तीन षटकार लगावले. 14 षटकात पाच बाद 90 अशी सीएसकेची स्थिती आहे.
-
शिवम दुबे-धोनीची जोडी जमली
शिवम दुबे आणि एमएस धोनीने डाव सावरला आहे. सीएसकेच्या 12 षटकात पाच बाद 69 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे 34 आणि धोनी सात रन्सवर खेळतोय.
-
-
चेन्नईची पाचवी विकेट
चेन्नईची पाचवी विकेट गेली आहे. 36 धावात निम्मा संघ तंबूत परतला आहे. अंबाती रायुडूने ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर सोपा झेल दिला.
-
CSK ची हालत खराब
CSK ची हालत खराब झाली आहे. कॅप्टन रवींद्र जाडेजा भोपळाही न फोडता तंबूत परतला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला OUT केल. सीएसकेची चौथी विकेट गेली आहे. त्यांची अवस्था चार बाद 23 आहे.
IK HORRRRRRRRRR!
Arshdeep Singh is off for a celebratory run. Jaddu bags a ?#CSK – 23/4 (5.3)#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #CSKvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
भरवशाचा फलंदाज मोईन अली OUT
वैभव अरोरामुळे CSK बॅकफूटवर आहे. भरवशाचा फलंदाज मोईन अली शुन्यावर OUT झाला आहे. सीएसकेची पाच षटकात तीन बाद 22 अशी स्थिती आहे.
CHOPPED ONNNNNN ➡️ M0⃣EEN
Vaibhav Arora strikes AGAIN! Waaaaah sadde ?#CSK – 22/3 (4.4)#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #CSKvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
CSK ची दुसरी विकेट, रॉबिन उथाप्पा OUT
रॉबिन उथाप्पाच्या रुपात सीएसकेची दुसरी विकेट गेली आहे. वैभव अरोराच्या गोलंदाजीवर त्याने मयंक अग्रवालकडे सोपा झेल दिला. उथाप्पाने 13 धावा केल्या. चेन्नईच्या तीन षटकात दोन बाद 16 धावा झाल्या आहेत.
In the air… taken! ???
Vaibhav sends Uthappa packing to open his account ?#CSK – 14/2 (2.2)#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #CSKvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
CSK ला पहिला झटका, ऋतुराज तंबूमध्ये
दुसऱ्या ओव्हरमध्ये सीएसकेला पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड अवघ्या एक रन्सवर आऊट झाला. रबाडाच्या गोलंदाजीवर त्याने स्लीपमध्ये धवनकडे सोपा झेल दिला. चेन्नईच्या दोन षटकात एक बाद 10 धावा झाल्या आहेत.
Rabada draws first ?
Gabbar takes a regulation at first slip ?#CSK – 10/1 (2)#SaddaPunjab #IPL2022 #PunjabKings #CSKvPBKS #ਸਾਡਾਪੰਜਾਬ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
चेन्नईच्या डावाला सुरुवात
चेन्नईच्या डावाला सुरुवात झाली आहे. रॉबिन उथाप्पा-ऋतुराज गायकवाड ही जोडी मैदानात आहे. पहिल्या षटकात बिनबाद पाच धावा झाल्या आहेत.
-
पंजाबला 180 धावांवर रोखलं
डेथ ओव्हर्समध्ये CSK ने जबरदस्त गोलंदाजी केली. पंजाबला 180 धावांवर रोखलं. पंजाब किंग्सने दहा ओव्हर्समध्ये 100 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पंजाबचा संघ सहज दोनशेपार जाईल असं वाटलं होतं. पण CSK ने चांगली गोलंदाजी केली. पंजाबकडून लिविंगस्टोनने सर्वाधिक 60 धावा केल्या.
Jordy Double Jor-a #WhistlePodu ?#CSKvPBKS #Yellove ?? pic.twitter.com/qgYvOgfiZi
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2022
-
19 षटकात आठ बाद 176 धावा
पंजाब किंग्सच्या 19 षटकात आठ बाद 176 धावा झाल्या आहेत. प्रिटोरिसयच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना राहुल चाहरने ब्राव्होकडे झेल दिला. त्याने 12 धावा केल्या.
-
सोलापूरला पावसाचा तडाखा
Solapur Rain : सोलापुरात अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, अवकाळीनं शेतकऱ्यांची चिंता वाढवली #rains #rain #Maharashtra
वाचा सविस्तर : https://t.co/cza1J8MLQ2 pic.twitter.com/sJmHamGA9P
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 3, 2022
-
आक्रमक ओडियन स्मिथ OUT
आक्रमक फलंदाज ओडियन स्मिथ बाद झाला आहे. त्याने फक्त तीन धावा केल्या. जॉर्डनच्या गोलंदाजीवर ब्राव्होकडे त्याने सोपा झेल दिला.
-
ओडियन स्मिथ-रबाडाची जोडी मैदानात
पंजाब किंग्सच्या 16 षटकात सहा बाद 151 धावा झाल्या आहेत. जितेश शर्मा 26 आणि शाहरुख खान 6 धावांवर आऊट झाला. ओडियन स्मिथ आणि रबाडाची जोडी मैदानात आहे.
-
शिखर धवन बाद
दहा षटकात पंजाब किंग्सच्या तीन बाद 109 धावा झाल्या आहेत. लिविंगस्टोन 55 धावांवर खेळतोय. शिखर धवन 33 धावांवर ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर जाडेजाकरवी झेलबाद झाला.
-
लिविंगस्टोनचा रायुडूने सोपा झेल सोडला
लिविंगस्टोनचा रायुडूने सोपा झेल सोडला. 7 ओव्हर्समध्ये पंजाबच्या दोन बाद 82 धावा. लिविंगस्टोन 45 आणि धवन 20 रन्सवर खेळतो.
-
लियाम लिविंगस्टोनची धमाकेदार बॅटिंग, आतापर्यंत 4 चौकार, 3 SIX
पाच षटकात पंजाबच्या दोन बाद 51 धावा झाल्या आहेत. लियाम लिविंगस्टोर धडाकेबाज बॅटिंग करत आहे. मुकेश चौधरीच्या एका षटकात चौकार-षटकारांचा पाऊस त्याने पाडला. लिविंगस्टोनने 26 धावा या ओव्हरमध्ये वसूल केल्या.
The longest SIX of #IPL2022 belongs to Livingstone – 108 meters ?#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #CSKvPBKS @liaml4893 pic.twitter.com/tSeN1juPmX
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 3, 2022
-
चार षटकांचा खेळ पूर्ण
चार षटकात पंजाब किंग्सच्या दोन बाद 31 धावा झाल्या आहेत. लियाम लिविंगस्टोन 14 आणि शिखर धवन 3 धावांवर खेळतोय.
-
पंजाबची दुसरी विकेट, भानुका राजपक्षे Runout
चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न PBKS ला महाग पडला. ख्रिस जॉर्डनने केलेल्या थ्रो वर महेंद्र सिंह धोनीने भानुका राजपक्षेला Runout केलं. त्याने नऊ धावा केल्या. पंजाबच्या दोन बाद 14 धावा झाल्या आहेत.
⚡️THALA ⚡️#WhistlePodu #Yellove #CSKvPBKS ??
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2022
-
राजपक्षे आणि शिखर धवनची जोडी मैदानात
पहिल्या षटकात PBKS च्या एक बाद 8 धावा झाल्या आहेत. राजपक्षे आणि शिखर धवनची जोडी मैदानात आहे.
-
दुसऱ्याच चेंडूवर पंजाबला झटका
मुकेश चौधरीने पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर पंजाबला झटका दिला आहे. सलामीवीर कॅप्टन मयंक अग्रवाल तंबूत परतला आहे. चार धावांवर खेळणाऱ्या मयंकने रॉबिन उथाप्पाकडे सोपा झेल दिला.
First one in #Yellove – Sabaaash Mukesh.! ???#WhistlePodu #Yellove #CSKvPBKS ??
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2022
-
अशी आहे पंजाब किंग्सची Playing – 11
मयंक अग्रवाल (कॅप्टन), शिखर धवन, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा,
-
अशी आहे चेन्नईची Playing – 11
X + I new ?! Cue the ?#CSKvPBKS #WhistlePodu #Yellove ?? pic.twitter.com/YRFHdWnVh4
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 3, 2022
Published On - Apr 03,2022 7:19 PM