Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK IPL 2023 Winner : मोहर बनला चाहर, क्रिकेटच्या बुद्धीबळात साहाने अशी केली धोनीवर मात

CSK IPL 2023 Winner : हवामानाने इतके अडथळे आणूनही IPL 2023 ची फायनल अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाली. सामन्याच्या लास्ट बॉलवर विजेता संघ ठरला. इतका हा सामना रोमांचक झाला.

CSK IPL 2023 Winner : मोहर बनला चाहर, क्रिकेटच्या बुद्धीबळात साहाने अशी केली धोनीवर मात
IPL 2023 FinalImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 12:47 PM

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्सच्या विजेतेपदाने IPL 2023 च्या सीजनची सांगता झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना रंगला होता. पावसामुळे 28 मे रोजी होणारी फायनल मॅच 29 मे रोजी खेळवावी लागली. पण त्यातही काल पावसाने बाधा आणली. हवामानाने इतके अडथळे आणूनही IPL 2023 ची फायनल अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाली. सामन्याच्या लास्ट बॉलवर विजेता संघ ठरला. इतका हा सामना रोमांचक झाला.

ही मॅच म्हणजे फक्त एक क्रिकेटचा सामना नव्हता. त्यात क्रिकेटमधील सर्वात चणाक्ष कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्याच तोडीचा गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या यांच्यातील बौद्धिक लढाई होती.

चणाक्ष धोनीने साहाला टार्गेट केलं

सामना बॅट-बॉलने खेळला गेला. पण त्यात डावपेच, रणनिती खूप महत्वाची होती. खेळाडूंचा अचूक वापर हा याच रणनितीचा भाग असतो. T20 क्रिकेटमध्ये जय-पराजय बऱ्याचदा रणनितीवर अवलंबून असतात. एमएस धोनी यात सर्वात माहीर कॅप्टन आहे. याच चणाक्ष धोनीने काल मॅचच्या सुरुवातीला वृद्धीमान साहाबरोबर असाच क्रिकेटचा बुद्धीबळ खेळला.

पावरप्लेमध्ये विकेट ही चाहरची खासियत

वृद्धीमान साहा गुजरात टायटन्सचा ओपनर आहे. काल सामना सुरु झाल्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये धोनीने दीपक चाहरकडे चेंडू सोपवला. पावरप्लेमध्ये विकेट घेणं ही चाहरची खासियत आहे. तो चेंडू उत्तम स्विंग करतो. त्याच्या याच गोलंदाजी गुणांचा फायदा उचलून धोनीला वृद्धीमान साहाला जाळ्यात अडकवायच होतं.

धोनी स्टम्पसच्या जवळ आला

दीपक चाहर बॉलिंगला आल्यानंतर वृद्धीमान साहाने त्याच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारला. साहाने स्टेपआऊट होऊन सिक्स मारला. त्यानंतच स्टम्पसपासून बराच लांब असलेला धोनी स्टम्पसच्या जवळ येऊन उभा राहिला. जेणेकरुन साहा स्टेपआऊट होण्याच पुन्हा धाडस करणार नाही. त्याच्यावर दबाव आणणं हा सुद्धा धोनीचा उद्देश होता.

साहा धोनीपेक्षा एक पाऊल पुढे

चाहरच्या दुसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. त्यावेळी धोनीचा डाव यशस्वी ठरला असं वाटलं. पण साहाने चाहरचा तिसरा चेंडू मिडविकेटला भिरकावून देत चौकार वसूल केला. त्यावेळी धोनीने ऑफसाइडला सीमारेषेनजीक उभा असलेला फिल्डर मिडविकेटला ठेवला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर साहाने कव्हरच्या डोक्यावरुन चौकार वसूल केला. साहा धोनीपेक्षा एक पाऊल पुढे निघाला. मोहरा यामध्ये दीपक चाहर बनला

त्यानंतर धोनी पुन्हा मागे गेला. त्या चेंडूवर साहाने 2 धावा केल्या. पुढचा ओव्हरमधील लास्ट बॉल निर्धाव होता. वृद्धीमान साहाने अशा प्रकारे दीपक चाहरच्या त्या ओव्हरमध्ये 16 धावा वसूल केल्या. एकप्रकारे साहाने क्रिकेटच्या या बुद्धीबळात धोनीवर मात केली. मोहरा यामध्ये दीपक चाहर बनला.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.