IPL 2021: केकेआरचं विजयाचं स्वप्न भंगलं, अखेरच्या चेंडूवर पराभव, रंगतदार सामन्यात चेन्नई विजयी

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स यांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यात अखेर चेन्नईने दोन गडी राखून रोमहर्षक असा विजय मिळवला आहे.

IPL 2021: केकेआरचं विजयाचं स्वप्न भंगलं, अखेरच्या चेंडूवर पराभव, रंगतदार सामन्यात चेन्नई विजयी
सीएसके विरुद्ध केकेआर
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 9:29 PM

IPL 2021: आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 38 वा सामना नुकताच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवला गेला. अगदी उत्कंठार्धक झालेला हा सामना शेवटच्या चेंडूवपर्यंत गेला. पण अखेरच्या चेंडूवर चेन्नईच्या दीपक चाहरने (Deepak Chahar) एक धाव घेत सामना चेन्नईच्या खिशात घातला. पण केकेआरच्या सुनील नारायणने (Sunil Narayan) टाकलेल्या अखेरच्या षटकाने सर्वांचेच मन जिंकले.

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील हा दुसरा डबल हेडर सामना आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि केकेआर या दोन्ही संघांनी दुसऱ्या टप्प्यातील दोन्ही सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या तर कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून प्ले ऑफचं तिकीट मिळवण्याचं प्लॅनिंग धोनीच्या चेन्नईने केलेलं असणार आहे. तर प्लेऑफचं तिकीट मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी केकेआरसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

केकेआरचे धाकड सलामीवीर फेल

केकेआरचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण मागील काही सामने उत्तम कामगिरी करणारे केकेआरचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेर अय्यर आज खास कामगिरी करु शकले नाही. गिलने 9 आणि अय्यरने 18 धावांच केल्या. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने दमदार 45 धावा ठोकत डाव सावरला. त्याला  नितीश राणाने (37) साथ दिली. तर अखेरच्या काही चेंडूत अनुभवी दिनेश कार्तिकने 11 चेंडूमध्ये केलेले 26 रनही केकेआरला महत्त्वाचे ठरले ज्यामुळे चेन्नईसमोर 172 धावांचे लक्ष्य होते.

अखेरच्या चेंडूवर चेन्नईविजयी

केकेआरचे सलामीवीर फेल गेले असले तरी चेन्नईचे सलामीवीर मात्र चालले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (40) आणि फाफ डुप्लेसी (43) यांनी चेन्नईला उत्तम सुरुवात करुन दिली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज अयशस्वी झाल्यानंतर 19 व्या षटकात जाडेजाने दोन षटकार आणि चौकार ठोकत चेन्नईच्या पारड्यात सामना आणून ठेवला. पण अखेरची ओव्हर सुनील नारायणने अप्रतिम टाकत दोन विकेट्सही घेतल्या. ज्यानंतर शेवटच्या एका चेंडूवर चेन्नईला एक धाव गरजेची असताना दीपक चाहरने ती घेत संघाला विजय मिळवून दिला.

हे ही वाचा

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादचं नशिब बदलणार?, राजस्थानविरुद्धच्या सामन्यासाठी जगातील उत्कृष्ट फलंदाज उतरणार मैदानात

IPL 2021: वॉर्नर-विलियमसनला बाद करत मोहम्मद शमीची ऐतिहासिक कामगिरी, ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज

IND vs AUS : 26 वनडे सामन्यांपासूनचा ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्यात भारतीय संघ यशस्वी, झुलन, शेफाली, स्नेह राणा चमकल्या

(Chennai super kings won Match against KKR on last ball of sunil narine over)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.