MS Dhoni चा विश्वासू भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळणार

महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएल (IPL) मध्ये एका गोलंदाजावर विश्वास ठेवला. काही सामन्यांमध्ये त्याची धुलाई झाली, तरी धोनीने त्याला संघात कायम ठेवलं. त्याला आता लॉटरी लागली आहे.

MS Dhoni चा विश्वासू भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलियात क्रिकेट खेळणार
cskImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 7:00 AM

मुंबई: महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएल (IPL) मध्ये एका गोलंदाजावर विश्वास ठेवला. काही सामन्यांमध्ये त्याची धुलाई झाली, तरी धोनीने त्याला संघात कायम ठेवलं. त्याला आता लॉटरी लागली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी (Mukesh Choudhary) ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 मॅक्स स्पर्धेत खेळताना दिसेल. मुकेश चौधरीशिवाय आणखी एक डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला सुद्धा ऑस्ट्रेलियात खेळण्याची संधी मिळाली आहे. सकारिया आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळला होता.

मुकेश चौधरी-सकारियाला ऑस्ट्रेलियातून बोलावणं

MRF पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मध्ये आदान-प्रदान कार्यक्रम चालतो. त्या अंतर्गत चेतन सकारिया आणि मुकेश चौधरी ब्रिस्बेन मध्ये क्रिकेट खेळणार आहेत. MRF पेस फाऊंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया मध्ये खेळाडूंच्या कोचिंगच आदान-प्रदान मागच्या 20 वर्षांपासून सुरु आहे. कोरोना व्हायरसमुळे मागची दोन वर्ष हे आदान-प्रदान झालं नव्हतं. पण आता ते पुन्हा सुरु झालं आहे.

सकारिया आणि मुकेश चौधरी कुठल्या टीमकडून खेळणार?

सकारियाने मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी 20 मध्ये आंतरराष्ट्रीय डेब्यु केला होता. मुकेश चौधरीने आयपीएल 2022 मध्ये डेब्यु केला. चेन्नईकडून खेळताना या गोलंदाजाने 13 सामन्यात 16 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 टुर्नामेंट मध्ये सकारिया सनशाइन कोस्टसाठी तर मुकेश चौधरी विन्नम-मॅनली कडून खेळताना दिसतील.

राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.