IND vs SA: चेतेश्वर पुजाराची चूक टीम इंडियाला भारी पडली, दक्षिण आफ्रिकेत कशी जिंकणार मालिका?

पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावातही कीगन पीटरसनने जबाबदारी उचलली. त्याने तिसऱ्यादिवस अखेर एल्गर सोबत चांगली भागादारी करुन विजयाचा पाया रचला.

IND vs SA: चेतेश्वर पुजाराची चूक टीम इंडियाला भारी पडली, दक्षिण आफ्रिकेत कशी जिंकणार मालिका?
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 6:18 PM

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) जाऊन कसोटी मालिका जिंकण्याच टीम इंडियाच स्वप्न पुन्हा एकदा भंगलं आहे. फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाने (Team india) मालिका जिंकण्याची संधी वाया घालवली. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी फक्त 212 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य आरामात पार केले. फलंदाजांबरोबर या सामन्यात क्षेत्ररक्षकांनीही चुका केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीत अपयशी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) एक सोपा झेल सोडला.

दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्याडावातही कीगन पीटरसनने जबाबदारी उचलली. त्याने तिसऱ्यादिवस अखेर एल्गर सोबत चांगली भागादारी करुन विजयाचा पाया रचला. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला त्याने अर्धशतक पूर्ण केले. भारताला पीटरसनचा विकेट हवा होता. 40 व्या षटकात ती संधी मिळाली.

पुजाराने संधी वाया घालवली बुमराह हे षटक टाकत होता. त्याने पीटरसनला अनेकदा चकवलं. अखेर बुमराहच्या चौथ्या चेंडूने पीटरसनच्या बॅटची कड घेतली व पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या पुजाराकडे सोपा झेल गेला. पण पुजाराला हा झेल पकडता आला नाही. भारतीय चाहत्यांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्या. पुजाराच्या या चुकीने सर्वांनाच हैराण केले. बुमराहसह टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला यावर विश्वास बसला नाही.

पीटरसन-डुसेची अर्धशतकी भागीदारी पीटरसनचा हा झेल सुटला त्यावेळी तो 59 धावांवर खेळत होता व दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 126 होती. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 86 धावांची आवश्यकता होती. पीटरसनने या चुकीचा फायदा उचलला व डुसे सोबत तिसऱ्याविकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. त्यावेळी हा विकेट मिळाला असता, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ अजून दबावाखाली आला असता.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.