IPL 2023: कोणी घेत नाही, म्हणून टीम इंडियाच्या दोन मोठ्या प्लेयरचा IPL न खेळण्याचा निर्णय
टीम इंडियाचे हे दोन मोठे खेळाडू कोण?
मुंबई: सध्या प्रत्येक क्रिकेटर आयपीएल खेळण्याच स्वप्न पाहतोय. आयपीएल खेळण्याची इच्छा आहे, कारण इथे भरपूर पैसा, सुविधा मिळतात. भारतातलेच नाही, तर विदेशातील खेळाडू सुद्धा आयपीएल खेळण्यासाठी फार इच्छुक आहेत. पण टीम इंडियाच्या दोन मोठ्या खेळाडूंना आयपीएलपासून लांब रहाण्याचा निर्णय घेतलाय. ते आयपीएलमध्ये सहभागी होणार नाहीत.हे दोन प्लेयर आहेत, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी. त्यांनी आयपीएल 2023 ऑक्शनसाठी आपलं नाव रजिस्टर केलेलं नाही.
कोण आहेत ते दोघे?
चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी यांना आयपीएल 2022 साठी कुठल्याही फ्रेंचायजीने विकत घेतल नव्हतं. आयपीएलमध्ये खेळून या दोघांना अनेक वर्ष झालीयत. त्यामुळेच या दोघांनी आता ऑक्शनमध्ये न उतरण्याचा निर्णय घेतलाय.
त्याचा स्ट्राइक रेट काय?
चेतेश्वर पुजाराने 2014 साली शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. पुजाराने 30 मॅचमध्ये 20.52 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 99.74 आहे.
आयपीएल 2023 च मिनी ऑक्शन कधी?
दुसऱ्याबाजूला 2019 मध्ये हनुमा विहारी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्याने 24 सामन्यात 88.47 च्या स्ट्राइक रेटने 284 धावा केल्यात. 23 डिसेंबरला कोच्चीमध्ये आयपीएल 2023 च मिनी ऑक्शन होणार आहे. 991 खेळाडूंनी आयपीएल ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केलय.