Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians IPL 2024 | रोहितला हटवण्यावरुन गदारोळ करणाऱ्यांना आकाश अंबानी एवढच म्हणाले….

Mumbai Indians IPL 2024 | सध्या मुंबई इंडियन्सची चर्चा आहे. कारण आयपीएलमधील या फ्रेंचायजीने एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी थेट नेतृत्वबदलाच पाऊल उचलल. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सोशल मीडियावर नाराजीचा मोठा सूर आहे. आता यावर टीमचे मालक आकाश अंबानी यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे.

Mumbai Indians IPL 2024 | रोहितला हटवण्यावरुन गदारोळ करणाऱ्यांना आकाश अंबानी एवढच म्हणाले....
MI Owner Akash Ambani
Follow us
| Updated on: Dec 20, 2023 | 10:53 AM

मुंबई : नुकतच IPL 2024 साठीच मिनी ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सच्या रणनितीवर क्रिकेटच्या जाणकरांच बारीक लक्ष होतं. कारण मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील एक लोकप्रिय टीम आहे. ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्याच्याजागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी नियुक्ती केली. खरंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मोठ यश मिळवलं. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाचवेळा आयपीएलच जेतेपद पटकावलं. चेन्नई आणि मुंबई या दोनच टीम्सना आयपीएलमध्ये सर्वाधिक पाचवेळा विजेतेपद पटकावता आलय. अन्य कुठलीही टीम या दोन फ्रेंचाजयींच्या आसपासही नाहीय. मुंबई इंडियन्सचा असा रेकॉर्ड असूनही त्यांनी रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवून त्याच्याजागी हार्दिक पांड्याची नियुक्ती केली.

मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय अनेकांना पटलेला नाही. सोशल मीडियावर यावरुन अजूनही मोठा गहजब सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर अनेकजण प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. या निर्णयामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या सुद्धा घटली आहे. मुंबई इंडियन्स आणि खासकरुन रोहितचे चाहते नाराज आहेत. सोशल मीडियावर हा गहजब सुरु असताना आता टीमचे मालक आकाश अंबानी यांच एक स्टेटमेंट समोर आलय. मुंबईच्या फ्रेंचायजीने हा व्हिडिओ शेअर केलाय.

काय म्हणाले आकाश अंबानी?

‘चिंता करु नका, तो बॅटिंग करेल’, असं आकाश अंबानी यांनी म्हटलं आहे. या स्टेटमेंटचा अर्थ रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबत असणार, तो टीमसाठी आपल योगदान देणार असा आहे. नेतृत्वबदल झाला, तरी रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससोबतच असणार आहे. मुंबई इंडियन्सचे ग्लोबल हेड माहेला जयवर्धने यांनी ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे. हार्दिककडे गुजरात टायटन्सच यशस्वी नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. त्याचा मुंबई टीमला फायदा होईल असं जयवर्धने यांचं मत आहे. मुंबई इंडियन्स भविष्याचा विचार करुन हा निर्णय घेतलाय. रोहित शर्माने आता वयाची पस्तीशी ओलांडली आहे. भविष्यात हार्दिककडेच टीम इंडियाच नेतृत्व सोपवल जाण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.