T20 World Cup 2021: ख्रिस गेलचं ‘निवृत्तीनाट्य’, युनिव्हर्स बॉसकडून अद्याप निवृत्तीची घोषणा नाही!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात 15 धावा करून गेल आऊट झाला तेव्हा पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केलं. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर सहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

T20 World Cup 2021: ख्रिस गेलचं 'निवृत्तीनाट्य', युनिव्हर्स बॉसकडून अद्याप निवृत्तीची घोषणा नाही!
Chris Gayle
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 2:03 PM

मुंबई : 2021 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजचा प्रवास संपला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होचा (Dwayne Bravo) हा शेवटचा सामना होता. त्याने यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली आहे. पण सामना संपल्यानंतर कॅरेबियन स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) ज्या पद्धतीने मैदानाबाहेर आला, ते पाहता तो टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता, अशी चर्चा रंगू लागली आहे. (Chris Gayle confirms he didn’t announce retirement, he will play 1 more T20 match in Jamaica)

ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात शनिवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात 15 धावा करून गेल आऊट झाला तेव्हा पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने बॅट उंचावून प्रेक्षकांना अभिवादन केलं. ड्रेसिंग रुममध्ये पोहोचल्यावर सहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. त्याने चाहत्यांना त्याचे क्रिकेटचे साहित्यही वाटून टाकले. हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही तर सामना संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने ब्राव्हो आणि गेल यांना गार्ड ऑफ ऑनरही दिला.

यावेळी क्रिकेट समालोचन करत असलेले इयान बिशप यांनी सांगितले की, हे सर्व काही सूचित करतेय की आपण गेलला वेस्ट इंडिजच्या जर्सीत शेवटचं पाहतोय. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही गेलचे त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी अभिनंदन केले, ज्याला उत्तर देताना गेलने त्याचे आभारही मानले. आफ्रिदीने ट्विट केले की, टी-20 क्रिकेटमधील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक. अप्रतिम कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. तू जगभरातील खेळाडूंच्या नवीन पिढीला प्रेरणा दिली आहेस.

ख्रिस गेलचं निवृत्तीनाट्य

एककीकडे ख्रिस गेलचं निवृत्तीनाट्य रंगलेलं असताना दुसऱ्या बाजूला विंडीज कर्णधार कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो आणि स्वत: गेलने याबाबत अधिकृतरीत्या विधान करणे टाळले होते. दरम्यान सामना संपल्यानंतर ब्राव्हो पत्रकार परिषदेत म्हणाला, “जोपर्यंत माझे शरीर मला साथ देईल तोपर्यंत मी आणखी काही वर्षे फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन.” 18 वर्षे वेस्ट इंडिजकडून खेळणारा ब्राव्हो म्हणाला की, “माझे ध्येय काही वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचे होते, पण अध्यक्षपद (वेस्ट इंडिज क्रिकेट) आणि नेतृत्व बदलल्यानंतर मी माझा विचार बदलला. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होतो आणि मला वेस्ट इंडिजला काहीतरी परत द्यायचे होते, म्हणून मी आणखी काही वर्ष क्रिकेट खेळलो. मी माझ्या क्रिकेटचा आनंद घेत होतो.” दरम्यान, ब्राव्होला गेलच्या निवृत्तीबाबत विचारले असता ब्राव्हो म्हणाला की, “गेलने नक्की काय निर्णय घेतला आहे, हे मला अजून ठाऊक नाही.”

जमैकात अखेरचा ट्वेन्टी-20 सामना खेळणार

एकीकडे 42 वर्षीय सलामीवीर ख्रिस गेलच्या निवृत्तीची चर्चा रंगलेली असताना रात्री उशिरा त्याने या चर्चांना पूर्णविराम दिला. गेल म्हणाला की, जमैका येथे एक अखेरचा ट्वेन्टी-20 सामना खेळून निवृत्ती पत्करणार असल्याचे त्याने स्पष्ट केले.

इतर बातम्या

निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्वेन ब्राव्होकडून चाहत्यांना खुशखबर, महेंद्रसिंह धोनीला मोठा दिलासा

T20 World Cup 2021: चॅम्पियन होण्यासाठी पाकिस्तानला आज स्कॉटलंडविरुद्धचा सामना गमवावा लागेल, पण का?

पुढील T20 World Cup च्या सुपर-12 मधील टीम कन्फर्म, BAN, AFG इन, WI, SL आऊट

(Chris Gayle confirms he didn’t announce retirement, he will play 1 more T20 match in Jamaica)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.