IPL 2023: भर कार्यक्रमात ख्रिस गेलने अनिल कुंबळेला ऐकवलं, ‘तू मला…’

IPL 2023: पंजाब किंग्स टीमचा विषय सुरु असताना नेमकं घडलं काय?

IPL 2023: भर कार्यक्रमात ख्रिस गेलने अनिल कुंबळेला ऐकवलं, 'तू मला...'
Anil Kumble
Follow us
| Updated on: Dec 26, 2022 | 5:09 PM

मुंबई: टीम इंडियाचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांना आयपीएलमध्ये कोचिंगचा दीर्घ अनुभव आहे. खेळाडू, मेंटॉर आणि कोच म्हणून त्यांनी आयपीएलमध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावल्या आहेत. मागच्यावर्षी अनिल कुंबळे पंजाब किंग्सचे कोच होते. पण या सीजनमध्ये ते पंजाब किंग्सचा भाग नाहीयत. त्यांच्याजागी ट्रेव्हर बेलिस यांची कोचपदी नियुक्ती करण्यात आलीय. ख्रिस गेल सुद्धा पंजाब टीमचा भाग होता. आयपीएल 2023 ऑक्शनच्या निमित्ताने दोघे एका कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी गेलने कुंबळेला टोला लगावला.

गेल काय म्हणाला?

आयपीएल 2023 चा लिलावाच्या निमित्ताने जियो सिनेमाचा एक शो सुरु होता. त्यात कुंबळसोबत गेल एक्सपर्ट म्हणून बसला होता. त्यावेळी गेलने कुंबळेला टोला मारला. कुंबळेने मला बदलल म्हणून तो सुद्धा आज इथे बसलाय असं गेल म्हणाला.

भर कार्यक्रमात आरोप

गेल आणि कुंबळे दोघे पंजाबच्या ऑक्शनमधील रणनितीबद्दल चर्चा करत होते. याच दरम्यान गेलने कुंबळेला टोला लगावला. गेलने त्याच्या स्टाइलमध्ये मस्करीत हा टोला लगावला. “मी कदाचित अनलकी साइडमध्ये असू शकतो. कुंबळेकडे पाहून म्हणाला, मी काय म्हणू?. मी काहीवेळा अनलकी साइडमध्ये राहिलोय. अनिल आता तिथे नाहीय. तो त्या टीमचा भाग होता. त्याने मला तिथून घालवलं. त्यामुळेच तो आज माझ्या शेजारी बसलाय” असं गेल मस्करीत म्हणाला. गेलच्या या टोमण्याला कुंबळेने सुद्धा तसच उत्तर दिलं. ‘आता आपण दोघे एकाच पानावर आहोत’ असं कुंबळे म्हणाला.

पंजाब अजूनही आयपीएल जेतेपदाच्या प्रतिक्षेत

पंजाबच्या टीमने आतापर्यंत एकदाही आयपीएलचा किताब जिंकलेला नाही. 2014 मध्ये एकदा पंजाबची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली होती. त्यावेळी कोलकाता नाइट रायडर्सने त्यांचा पराभव केला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.