IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर, ‘हे’ आहे कारण

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील आजचा सामना पंजाब आणि कोलकाता या संघामध्ये असून प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. पण या सामन्यापूर्वीच पंजाब संघाला एक मोठा झटका बसला आहे.

IPL 2021: केकेआरविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाबला मोठा धक्का, धडाकेबाज फलंदाज स्पर्धेतून बाहेर, 'हे' आहे कारण
पंजाब किंग्स
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:45 PM

IPL 2021: आज (1 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) या दोन संघामध्ये यंदाच्या पर्वातील 45 वा सामना खेळवला जात आहे. प्लेऑफमध्ये एन्ट्रीसाठी हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा असताना पंजाब संघाला सामन्यापूर्वीच एक मोठा झटका बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (Chirs Gayle) याने संपूर्ण आय़पीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे गेलचं मत पोस्ट केलं आहे.

गेलने याबाबतची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली असून तो म्हणाला, “मागील काही महिने मी विविध स्पर्धांसाठी वेगवेगळ्या बायोबबलमधून फिरत आहे. आधी कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएल. या सर्वामुळे मी मानसिक दृष्टीने फार थकलो आहे. त्यामुळे स्वत:ला रिफ्रेश करुन आगामी टी20 विश्व चषकात (ICC T20 World Cup) वेस्टइंडीज संघाकडून चांगली कामगिरी करण्याकरता स्वत:ला वेळ देत आहे. मी पंजाब किंग्स संघाच धन्यवाद करतो आणि माझ्या सदीच्छा कायम त्यांच्यासोबत असतील.”

PBKS कडूनही गेलला शुभेच्छा

गेलच्या पोस्टनंतर पंजाब किंग्सनेही त्याच्या निर्णयाचं समर्थन करताना एक पोस्ट लिहीली. ज्यात त्यांनी म्हटलं, “एक संघ म्हणून आम्ही गेलच्या या निर्णयाला समजून घेऊन त्याला पाठिंबा दर्शवतो आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा सन्मान करतो आणि त्याला काही मदत हवी असल्यास नक्कीच करण्याची तयारी दर्शवतो. तसंच आमच्याकडून ‘यूनिव्हर्सल बॉस’ ला आगामी टी20 विश्व चषकासाठी शुभेच्छा”

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

केकेआर- इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, प्रसिद्ध कृष्णा, वरुण चक्रवर्ती.

पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), मयांक अगरवाल, निकोलस पुरन, दीपक हुडा, शाहरुख खान, ख्रिस जॉर्डन, आदिल रशिद, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग.

हे ही वाचा –

KKR vs PBKS, Head to Head: कोलकात्याचे रायडर्स लढणार पंजाब किंग्जशी, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

VIDEO : सचिनला ड्रेसिंगरुमध्ये पाहताच इशान किशन थबकला, पुढे जे केलं ते पाहाच

T20 World cup संघात ‘या’ खेळाडूला न घेणं भारताला महाग पडणार?, युएईमध्ये करतोय धमाल

(Chris gayle took name back from IPL 2021 he will not play from punjab kings for this season from now onwards)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.