…तर राहुल द्रविड अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना टीममधून वगळू शकतो, दिनेश कार्तिक नेमकं काय म्हणाला ?
कसोटीदरम्यान खराब कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याविषयी दिनेश कार्तिकने महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीड त्यांना इंडियन टीममधून वगळू शकतो असं कार्तिकने म्हटलंय. तसा अंदाज त्याने व्यक्त केलाय.
जोहान्सबर्ग : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियानं पहिल्या सामन्यात विजय मिळवला असून सध्या दुसरी कसोटी सुरु आहे. मात्र, या कसोटीदरम्यान खराब कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याविषयी दिनेश कार्तिकने महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रवीड त्यांना सध्याच्या इंडियन टीममधून वगळू शकतो असं कार्तिकने म्हटलंय. तसा अंदाज त्याने व्यक्त केलाय.
…तर राहुल द्रविड कठोर निर्णय घेऊ शकतो
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुजारा 33 चेंडूमध्ये फक्त 3 धावा करु शकला. तर अजिंक्य रहाणेनेही आपली विकेट अगदी सहजपणे गमावली. दोघेही सहज बाद झाल्यामुळे पुढच्या पळतील फलंदाजांना जास्त मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर के.एल. राहुल आणि रविचंद्रन अश्विन यांची चांगला खेळ खेळल्यामुळे भारत 63.1 षटकांत 202 धावा करु शकला. या ठोकताळ्यांकडे बघून यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने काही भाकित केलं आहे. राहुल द्रविडला रहाणे आणि पुजारा या दोघांसर्भात काही कठोर निर्णय घ्यायचे असतील तर तो घेऊ शकतो, असे दिनेश यांनी सांगितले आहे. क्रिकबझशी बोलताना त्याने हे वक्तव्य केले आहे.
दोघांनाही आतापर्यंत चांगली संधी मिळाली
तसेच पुढे बोलताना मला वाटतं की राहुल द्रविडला काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील. जर द्रविडला रहाणे आणि पुजारा यांना वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला तर तो मागेपुढे पाहणार नाही. कारण या दोघांनाही आतापर्यंत चांगली संधी मिळालेली आहे, असेही कार्तिकने सांगितले. तसेच द्रविडने प्रशिक्षक म्हणून आताच जबाबदारी सांभाळल्यामुळे त्याला काही गोष्टींचे विश्लेषणही करावे लागेल, असेही कार्तिकने सांगितले.
रहाणे, पुजाराची खराब कामगिरी
दरम्यान, रहाणे त्याच्या मगील नऊ सामन्यांमध्ये अर्धशकतसुद्धा करु शकलेला नाही. तसेच पुजारानेदेखील शेवटच्या 45 सामन्यात एकही शतक झळकावलेले नाही. जानेवारी 2019 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या सात डावांमध्ये त्याने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. याच कारणामुळे दिनेश कार्तिकने पुजारा आणि रहाणे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याला मोठे महत्त्व आले आहे.
इतर बातम्या :
IND vs SA: अजिंक्य-चेतेश्वरला ALL THE BEST, दोघांसाठी आज ‘करो या मरो’
Shardul Thakur: तू आहेस तरी कोण? स्टंम्पवरच्या मायक्रोफोनमुळे अश्विनने विचारलेला प्रश्न जगाला कळला