टी-20 नंतर रोहित शर्माकडे कसोटी संघाचं नेतृत्व, अजिंक्य रहाणेला मागे टाकणार? NZ विरुद्धच्या मालिकेत फैसला
आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 आणि कसोटी मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
मुंबई : आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर आता भारताला न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर टी-20 आणि कसोटी मालिका खेळायची आहे. टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आला असून त्याने आता अजिंक्य रहाणेसमोर आव्हान निर्माण केलं आहे. (confusion between Ajinkya Rahane and Rohit Sharma as test captain against New Zealand series)
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार कोण होणार यावरून रोहित आणि रहाणे यांच्यात स्पर्धा सुरू आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली उपलब्ध होणार नाही आणि अशा परिस्थितीत त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व कोण करणार यावरून गोंधळ सुरू आहे.
विराटने या टी-20 फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे नुकतेच रोहितकडे या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रोहितकडे वनडे संघाची कमानही सोपवली जाऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचबरोबर कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणे संघाची धुरा सांभाळतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर कोहली भारतात परतला आणि रहाणेने उर्वरित सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आणि मालिकाही जिंकली. त्यामुळे तो शर्यतीत आहे. रोहित एक लीडर म्हणून उदयास आल्याने निवडकर्त्यांमध्ये त्याच्या आणि रहाणेच्या कर्णधारपदाबद्दल संभ्रम आहे. कोहली मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल. कोहली पूर्णवेळ कसोटी कर्णधार असेल. वृत्तपत्राने आपल्या वृत्तात लिहिले आहे की, निवडकर्ते रहाणेकडेच संघाची कमान सोपवतील.
या खेळाडूंना आराम मिळण्याची शक्यता
ICC टी-20 विश्वचषक-2021 मध्ये भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. संघ उपांत्य फेरी गाठू शकला नाही. यानंतर संघाचे तत्कालीन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांनी सतत बायो बबलमध्ये राहिल्यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे सांगितले. त्यामुळे बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली तेव्हा अनेक खेळाडूंना विश्रांती दिली. कसोटी मालिकेतही हेच पाहायला मिळेल. कसोटी मालिकेतही काही खेळाडूंना विश्रांती देण्याचा विचार निवड समिती करत आहे. ज्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते त्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्या नावांचा समावेश असू शकतो.
पंतच्या जागी साहाला संधी!
याशिवाय यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतही सतत खेळत असून त्यालाही विश्रांती दिली जाऊ शकते. पंतने आयपीएल-2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आणि इंग्लंड दौऱ्यावरही तो संघासोबत होता. तो टी-20 विश्वचषकही खेळला होता. निवडकर्ते पंतच्या जागी वृद्धीमान साहाला संधी देण्याच्या मनस्थितीत आहेत तर केएस भरतला दुसऱ्या यष्टीरक्षक म्हणून निवडले जाऊ शकते.
इतर बातम्या
ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही
(confusion between Ajinkya Rahane and Rohit Sharma as test captain against New Zealand series)