आकाश चोपडा KL Rahul चा इतका बचाव करतोय, त्यामागे सुनील शेट्टी कनेक्शन का?
KL Rahul Selection Controversy : केएल राहुलची टीम इंडियात निवड करताना, तो भरपूर टॅलेंटेड असल्याच कारण पुढे केलं जातं. पण ते टॅलेंट अजूनपर्यंत तरी टीम इंडियाच्या उपयोगाला आलेलं नाही.
KL Rahul Selection Controversy : सध्या केएल राहुलच्या सिलेक्शनवरुन टीम इंडियात मोठं वादळ निर्माण झालय. त्याचे समर्थक आणि विरोधक असे दोन गट सक्रीय झाले आहेत. राहुल टीममध्ये नकोच, असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामागे कारणही तसचं आहे. केएल राहुलला आतापर्यंत इतक्या संधी मिळाल्या, पण तो काही विशेष करु शकलेला नाही. उलट टीमवरती तो ओझ बनलाय. त्यामुळे केएल राहुलवर सातत्याने टीका सुरु आहे. केएल राहुलची टीम इंडियात निवड करताना, तो भरपूर टॅलेंटेड असल्याच कारण पुढे केलं जातं. पण ते टॅलेंट अजूनपर्यंत तरी टीम इंडियाच्या उपयोगाला आलेलं नाही.
केएल राहुलला बाहेर करण्याची मागणी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू सीरीजमध्ये त्याच प्रदर्शन खूपच खराब आहे. दोन कसोटीतील प्रभावहीन कामगिरीमुळे त्याला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने राहुलला टीम बाहेर करण्याची मागणी लावून धरलीय. त्याचवेळी आकाश चोपडा केएल राहुलच्या समर्थनार्थ पुढे आलाय.
How can you give an honest opinion on KL Rahul when you call his father-in-law a father figure? You should have disclosed your conflict of interests to people before taking a high ground and call @venkateshprasad an agenda peddler.pic.twitter.com/ZGFwjXKtse
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) February 21, 2023
फॅन्सनी आकाशा चोपडाला विचारलं
आता या प्रकरणात आकाश चोपडाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यावरुन आकाश चोपडाला ट्रोल केलं जातय. आकाश चोपडा एका व्हिडिओत सुनील शेट्टी सोबत चर्चा करताना दिसतोय. सुनील शेट्टी आपल्यासाठी मार्गदर्शक, वडिलांसमान असल्याच आकाश चोपडाने या व्हिडिओमध्ये म्हटलय. म्हणून तू केएल राहुलचा बचाव करतोयस का? असा प्रश्न फॅन्स आकाश चोपडाला विचारतायत. सुनील शेट्टीची मुलगी आथिया केएल राहुलची पत्नी आहे. मागच्याच महिन्यात दोघांच लग्न झालं. केएल राहुलची टेस्टमधील आकडेवारी
केएल राहुलचे टेस्टमधील आकडे खूपच खराब आहेत. केएल राहुलची टेस्टमधील सरासरी फक्त 33.44 आहे. तो 47 कसोटी सामने खेळलाय. इतके कसोटी सामने खेळल्यानंतर त्याची सरासरी खूपच खराब आहे. केएल राहुलने 7 पैकी 6 सेंच्युरी परदेशात झळकावल्या आहेत. पण त्याच्या प्रदर्शनात सातत्याचा अभाव आहे.