IPL वर पुन्हा कोरोनाचे ग्रहण, चिल्ली-चैन्नई मॅचच्या आधी दिल्लीचा नेटबॉलर कोरोना पॉझटिव्ह, दोन क्रिकेटर्सना केले क्वारंटाईन
दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत असलेला एका नेटबॉलर कोरोना संक्रमिती झआला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर हा क्रिकेटर ज्या प्लेअरसोबत हॉटेलच्या खोलीत राहत होता, त्या क्रिकेटरलाही क्वरंटाईन करण्यात आले आहे. आजची मॅच धरुन अद्याप दिल्लीला चार मॅचेस खेळायच्या आहेत.
मुंबई – IPL2022 दिल्ली कॅपिटल्स (DC)आणि चैन्नई सुपर किंग्ज (CSK) या मॅचच्या आधी दिल्लीचा एक क्रिकेटर कोरोना (Covid)संक्रमित असल्याचे समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत असलेला एका नेटबॉलर कोरोना संक्रमिती झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर हा क्रिकेटर ज्या प्लेअरसोबत हॉटेलच्या खोलीत राहत होता, त्या क्रिकेटरलाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. आजची मॅच धरुन अद्याप दिल्लीला चार मॅचेस खेळायच्या आहेत. मात्र अद्याप याबबत आयपीएल आणि दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
ESPNcricinfo has learned that the entire Delhi Capitals’ contingent underwent a fresh round of PCR tests on Sunday morning and was asked by IPL authorities to stay in their hotel rooms until further notice #CSKvDC #IPL2022
हे सुद्धा वाचा— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 8, 2022
या सीझनमध्ये यापूर्वीही दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचे प्रकरण
IPL च्या 15 व्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटर पॉझिटिव्ह होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे दोन परदेशी क्रिकेटर्स टीम सिफर्ट आणि मिचेल मार्श यांच्यासहित चार जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते.
मुख्य कोचचे नीकटवर्तीयही झाले होते संक्रमित
दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य कोच रिकी पाँटिंग यांचे नीकटवर्तीयही कोरोना संक्रमित झाले होते. त्यानंतर पाँटिंग यांना काही दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागले होते. त्यामुळे मॅचेसच्या काळात ते टीमसोबत उपस्थित राहू शकले नाहीत.
दिल्लीची मॅच पुण्यातून मुंबईला केली होती शिफ्ट
दिल्ली कॅपिटल्सचे दोन प्लेअर्स आणि इतर 4 सदस्य कोरोना पॉझटिव्ह झाल्यानंतर दिल्लीची पूर्ण टीम क्वारंटाईन करण्यात आली होती. तसेच पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यासोबत असलेल्या मॅचेस पुण्यातून मुंबईत हलवण्यात आल्या होत्या.
गेल्या वेळी आयपीएलचा सीझन करावा लागला होता स्थगित
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचा फटका गेल्यावर्षीही आयपीएलला बसला होता. कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा सीझन स्थगित करण्याची वेळ बीसीसीआयवर आली होती. याही वेळी हा प्रकार घडू नये यासाठी पूर्ण उपाययोजना करण्यात आल्या होत्या. आता आयपीएलबाबत पुढे काय होणार, याची उत्सुकता आहे.
देशात गेल्या 24 तासांत 3451 रुग्णांची भर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत 3451 रुग्णांची भर पडली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 35 रुग्ण एकट्या केरळ राज्यातील आहे. सध्या देशात कोरोना रुग्णांचा एकूण आकडा हा 4,25,57,495 वर पोहचला आहे.
भारतात 47 लाख रुग्ण दगावले– WHO
कोरोना संसर्गामुळे देशात आत्तापर्यंत 5 लाख 24 हजार 64 रुग्ण दगावल्याची आकडेवारी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं भारतात कोरोनामुळे 47 लाख रुग्ण दगावल्याचा आकडा जाहीर केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.