सगळी टीम फेल फक्त एकटा नडला, क्रिकेटच्या मैदानात दाखवला ‘वन मॅन शो’
प्रत्येक संघाला असा प्लेयर टीममध्ये हवा असतो. त्याचा सुपर परफॉर्मन्सच सगळं काही सांगून जातो
मुंबई: इंग्लिश गोलंदाज लियाम नॉरवेलने कमाल केलीय. त्याने एकट्याच्या बळावर वॉरविकशायरला विजय मिळवून दिला. त्याने आपल्या टीमला पराभवापासून वाचवलं. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये डिवीजन वनच्या सामन्यात वॉरविकशायरने हॅम्पेशायरला 139 धावांच सोपं लक्ष्य दिलं होतं. वॉरविकशायरच्या फलंदाजांनी निराश केलं होतं. हॅम्पेशायरसाठी विजय सोपा वाटत होता. पण यानंतर मैदानावर जे घडलं, त्या बद्दल फार कमी जणांनी विचार केला असेल.
आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला
लियाम नॉरवेलने विकेटवर आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. हॅम्पेशायरची वाट लावून टाकली. लियामच्या तुफानात हॅम्पेशायरची टीम उद्धवस्त झाली. त्याने एकट्याने चौथ्या डावात नऊ विकेट घेतल्या. सोप्या वाटणाऱ्या लक्ष्याचा त्याने बचाव केला. त्याने 62 धावा देऊन 9 विकेट घेतल्या. 5 धावांनी टीमला विजय मिळवून दिला. लियामने एकूण 13 विकेट घेतल्या.
फक्त निक गब्सिनने लियामच्या तुफानी गोलंदाजीचा सामना केला. तो 46 धावांची इनिंग खेळला. 9 फलंदाज इनिंगमध्ये 15 पेक्षा जास्त धावा करु शकले नाहीत. वॉरविकशायरने प्रथम फलंदाजी करताना 272/4 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.
वॉरविकशायरची टीम पिछाडीवर पडलेली
हॅम्पेशायरने 311 धावा करुन पहिल्याडावात आघाडी घेतली होती. पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर वॉरविकशायरने दुसऱ्याडावात 177 धावा केल्या. वॉरविकशायरचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. खराब फलंदाजीमुळे सामना हॅम्पेशायरच्या बाजूने झुकला होता.
लियामने टीमला वाचवलं
हॅम्पेशायरला 139 धावांच लक्ष्य मिळालं होतं. पण लियामच्या धारदार गोलंदाजीसमोर हॅम्पेशायरचा दुसरा डाव 133 धावात आटोपला. वॉरविकशायरकडून रॉब यट्सने पहिल्याडावात शतक झळकावलं. लियामने या मॅचमध्ये एकूण 13 विकेट घेतल्या.
डिवीजन वनमध्ये आव्हान जिंवत ठेवण्यासाठी वॉरविकशायरला विजय आवश्यक होता. लियामने टीमला बाहेर होण्यापासून वाचवलंय वॉरविकशायरच्या विजयामुळे यॉर्कशायरचं डिवीजन वनमधील आव्हान संपुष्टात आलं.