T20 World Cup 2022: वेस्ट इंडिज विरुद्धच्या मॅचआधी कॅप्टनला आला अटॅक
T20 World Cup 2022: कॅप्टनला अटॅक आल्याने शेवटच्या क्षणी टीम बदलावी लागली.
होबार्ट: T20 World Cup 2022 मध्ये झिम्बाब्वेच्या टीमला वेस्ट इंडिज विरुद्धच्या (ZIM vs WI) मॅचआधी मोठा झटका बसला. या दोन्ही टीम्सचा सुपर 12 राऊंडमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष सुरु आहे. झिम्बाब्वेचा कॅप्टन क्रेग एर्विनला (craig ervine) वेस्ट इंडिज विरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात खेळता आलं नाही. त्याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नाही.
त्याच्याजागी कोण कर्णधार?
क्रेग एर्विनला या मॅचआधी अस्थनाचा अटॅक आला. त्यामुळे त्याला मॅचमध्ये खेळता आलं नाही. त्याच्याजागी उपकर्णधार रेगिस चकाब्वाला कॅप्टन बनवण्यात आलं.
त्याचा टीममध्ये समावेश केला नाही
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने क्रेग एर्विनची तब्येत बिघडल्याची माहिती दिली. एर्विनला अस्थमाचा आजार आहे. मॅचआधी त्याला त्रास झाला. खबरदारी म्हणून त्याचा टीममध्ये समावेश केला नाही, अशी बोर्डाने प्रेस रिलीजद्वारे माहिती दिली.
पुढची मॅच स्कॉटलंड विरुद्ध
खबरदारी म्हणून क्रेग एर्विनला आराम देण्यात आला. पहिल्या राऊंडमधील शेवटचा सामना त्याला खेळता यावा, हा त्यामागे उद्देश आहे. झिम्बाब्वेचा पुढचा सामना स्कॉटलंड विरुद्ध आहे. 21 ऑक्टोबरला स्कॉटलंड आणि झिम्बाब्वेमध्ये सामना होणार आहे.
सिकंदर रजाची जबरदस्त गोलंदाजी
क्रेग एर्विनच्या अनुपस्थितीत झिम्बाब्वेच्या टीमने कमालीचा खेळ दाखवला. त्यांच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या मोठ्या हिटर्सना मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही. सिकंदर रजाने 4 ओव्हरमध्ये 19 धावा देऊन वेस्ट इंडिजच्या 3 विकेट काढल्या. त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं.