VIDEO : OUT केल्यानंतर बॉलर इतक्या त्वेषाने बॅट्समन जवळ गेला की, मैदानातच दोघांची मारामारी

सोशल मीडियावर क्रिकेट मॅचचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. एका मोठ्या लीगमध्ये ही घटना घडली. एका गोलंदाजाने रबदान टीमच्या एका फलंदाजाला आऊट केल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. गोलंदाज जोशमध्ये आला.

VIDEO : OUT केल्यानंतर बॉलर इतक्या त्वेषाने बॅट्समन जवळ गेला की, मैदानातच दोघांची मारामारी
Cricket Fight
Follow us
| Updated on: Sep 20, 2024 | 9:58 AM

क्रिकेटला नेहमी जंटलमन्स गेम म्हटलं जातं. पण क्रिकेटच्या मैदानात अनेकदा खेळाडूंमध्ये शाब्दीक बाचाबाची पाहायला मिळते. खेळाडूंमध्ये शाब्दीक वाद सामान्य बाब आहे. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून क्रिकेट फॅन्स हैराण होतील. मैदानात खेळाडूंमधील स्पर्धा इतकी विकोपाला गेली की, विषय हाणामारीपर्यंत जाऊन पोहोचला. व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसतय. मैदानात खेळाडू आपसात भिडले. लाथा-बुक्क्यांनी प्रहार केले.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ हो एमसीसी वीकडेज बॅश XIX लीगचा आहे. UAE मध्ये ही लीग खेळवली जाते. या लीगमध्ये एरोविसा क्रिकेट आणि रबदान क्रिकेट क्लबमध्ये एक सामना झाला. या मॅचमध्ये दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी सर्व मर्यादा ओलांडल्या. सामन्या दरम्यान एरोविसा क्रिकेट टीमच्या एका गोलंदाजाने रबदान टीमच्या एका फलंदाजाला आऊट केल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केलं. गोलंदाज जोशमध्ये आला. त्याने विकेटच सेलिब्रेशन करताना खूप आक्रमकता दाखवली.

मारामारी करता, करता दोघे मैदानातच पडले

गोलंदाजाच हे सेलिब्रेशन पाहून फलंदाजाचा मैदानातच संयम सुटला. त्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानातच हाणामारी सुरु झाली. मारामारी करता, करता दोघे मैदानातच पडले. टीमच्या अन्य खेळाडूंनी आणि अंपायरने दोघांना वेगळं करण्याचा भरपूर प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

बांग्लादेशातही असच घडलं

क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंमध्ये हाणामारी, मारामारीच्या घटना फार कमी पहायला मिळतात. अनेकदा खेळाडू आपलं संतुलन गमावतात. मागच्यावर्षी बांग्लादेशातला सेलिब्रिटी लीगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. अंपायरच्या एका निर्णयानंतर दोन्ही टीम्सचे खेळाडू आपसात भिडले होते. त्यानंतर ही लीग रद्द करण्यात आली. भारतातही देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा हाणामारीच्या घटना घडल्या आहेत.

रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....