क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा ‘भयंकर’ विजय

आफ्रिकेने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 49.5 षटकात 438 धावा केल्या होत्या. हर्षल गिब्जने त्यावेळी आफ्रिकेकडून 175 धावांची वादळी खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया- आफ्रिकेमधील या सामन्याची चर्चा आजही होते.

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात मोठा इतिहास न्यूझीलंडच्या नावावर, वन डे मध्ये 491 धावा, 347 धावांचा 'भयंकर' विजय
New Zealand women cricket team
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 11:41 AM

वेलिंग्टन : क्रिकेटच्या मैदानात (Cricket update) अनेक मोठ मोठी धावसंख्या आपण पाहिली आहे. 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (australia vs south africa 438) यांच्यात झालेला वन डे सामना आजही बहुसंख्य क्रिकेटप्रेमींच्या जसाच्या तसा लक्षात आहे. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 434 धावांचं एव्हरेस्ट एवढं लक्ष्य आफ्रिकेसमोर ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जीवाची बाजू लावून हा एव्हरेस्ट 1 विकेट आणि 1 चेंडू राखून पार केला होता. आफ्रिकेने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 49.5 षटकात 438 धावा केल्या होत्या. हर्षल गिब्जने त्यावेळी आफ्रिकेकडून 175 धावांची वादळी खेळी केली होती. ऑस्ट्रेलिया- आफ्रिकेमधील या सामन्याची चर्चा आजही होते. (Cricket most run record in one day match New Zealand women team vs Ireland)

असं असलं तरी क्रिकेटच्या मैदानात असो वा कोणत्याही क्षेत्रात विक्रम बनतात ते तुटण्यासाठीच असं म्हटलं जातं. आफ्रिकेच्या 438 धावांचा विक्रम आजपासून तीन वर्षापूर्वी म्हणजे 8 जून 2018 रोजी न्यूझीलंडने (New Zealand cricket team) मोडला होता. न्यूझीलंडने नव्या विक्रमाची नोंद केली. हा विक्रम म्हणजे न्यूझीलंडने वन डेच्या मैदानात केवळ 4 विकेट्सच्या बदल्यात उभारलेल्या 491 धावा होय. याच विक्रमाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

महिला क्रिकेट सामना 

हा सामना होता न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड (New Zealand vs Ireland Women) या देशाच्या महिला क्रिकेटसंघामध्ये. हा सामना डब्लिन इथं झाला होता. न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने 4 विकेट्सच्या मोबदल्यात तब्बल 491 धावा ठोकल्या होत्या. न्यूझीलंडची कर्णधार आणि सलामीवीर सूजी बेट्सने 94 चेंडूत 151 धावांचं वादळ निर्माण केलं होतं. यामध्ये तिने 24 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते.

सूजी बेट्सशिवाय मॅडी ग्रीननेही झंझावाती फलंदाजी केली. तिने 77 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकारासह 122 धावा केल्या होत्या. तसंच एमिलिया केरच्या 45 चेंडूत 81 धावा, जेस वाटकिनच्या 59 चेंडूत 10 चौकारांसह 62 धावा असा धावांचा पाऊस न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाडला होता. तर आयर्लंडच्या कॅरी मरेच्या गोलंदाजीवर 10 षटकात तब्बल 119 धावा लुटल्या होत्या.

न्यूझीलंडचा 347 धावांनी विजय

या सामन्यात क्रिकेटमधील मोठमोठे विक्रम रचले गेले. न्यूझीलंडच्या फलंदाजीने अनेक विक्रम मोडले. तर गोलंदाजीतही न्यूझीलंडच्या महिलांनी कमाल केली. आयर्लंड महिला संघ 491 धावांचा पाठलाग करताना प्रचंड दबावात दिसला. त्यामुळे हा संघ अवघ्या 144 धावांत कोसळला. आयर्लंड संघाने 35 षटकं कशीबशी खेळून काढली. कर्णधार लॉरा डेलेनीने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय जेनिफर ग्रेचं 35 धावांचं योगदान वगळता, आयर्लंडचे फलंदाज तग धरु शकले नाहीत. त्यामुळे न्यूझीलंडच्या महिला संघाने तब्बल 347 धावांनी ‘महाभयंकर’ विजयाची नोंद केली.

संबंधित बातम्या 

WTC फायनल सामन्यात सर्वाधिक रन्स कोण करणार? अजित आगरकरने सांगितलं नाव!

या अंपायरने अंपायरींग केली की टीम इंडिया मॅच हरतेच, WTC फायनलसाठी ICC कडून ‘या’ अंपायरची घोषणा!

(Cricket most run record in one day match New Zealand women team vs Ireland)

दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.