मुंबई : आपल्या तुफानी फलंदाजीने गोलंदाजांना गारद करणारा वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेल क्रिकेटमधून संन्यास घेणार आहे का ? असे विचारले जात आहे. कारण ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या टी20 सामन्यात ख्रिस गेलने असं काही केलं आहे की, ज्यामळे हा प्रश्न उपस्थित केला जातोय. सोशल मीडियावर तर गेल खरंच संन्यास घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
ख्रिस गेलने क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे का असे विचारले जात आहे. मात्र तशी कोणतीही घोषणा ख्रिस गेलने अद्यापतरी केलेली नाही. असे असले तरी आज ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात बाद झाल्यानंतर ख्रिस गेलने जे केलं त्यावरून तो निवृत्त झाल्याचं म्हटलं जात आहे. ख्रिस गेलने ऑस्ट्रेलियावरुद्धच्या सामन्यात 15 धावा केल्या. या पूर्ण खेळीमध्ये गेलने दोन षटकार लगावले. शेवटी पवेलियनमध्ये परतताना त्याने आपली बॅट आणि हेल्मेट हवेत वर केले.
गेलने त्याच्या चाहत्यांकडे पाहून अभिवादन केले. विशेष म्हणजे परतत असताना तो अत्यंत शांतपणे येत होता. त्याचे हे हावभाव पाहून तो वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये शेटचा सामना खेळत आहे, असेच त्याच्या चाहत्यांना वाटले. गेल मैदानातून परतत असताना वेस्ट इंडिजच्या इतर खेळाडूंनी त्याला ट्रिब्यूट दिलं. गेलने इतर खेळाडूंना देलेल्या आलिंगनाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
Chris Gayle! ❤️#WIvsAUS pic.twitter.com/ZpHN3YkZrm
— ‘Z (@_NyrraZo) November 6, 2021
The numbers are mind blowing in T20 format for Chris Gayle. pic.twitter.com/xIOgrHtWUk
— Johns. (@CricCrazyJohns) November 6, 2021
ख्रिस गेलने संन्यास घेतल्याची चर्चा होत असली तरी त्याने किंवा वेस्ट इंडिजच्या संघाने तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. सध्या तो 42 वर्षांचा आहे. वयाच्या 45 वर्षापर्यंत खेळण्याची त्याची इच्छा असल्याचे म्हटले जाते. तो कधी संन्यास घेणार यावर मागील अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या चर्चा होत आलेल्या आहेत. दोन वर्षापूर्वी गेलने भारताविरुद्ध खेळताना 41 चेंडूमध्ये 72 धावा केल्या होत्या. यावेळीदेखील तो मैदानात अशाच पद्धतीने परतला होता. त्याला सर्व खेळाडूंनी ट्रिब्यूट दिलं होतं. दरम्यान, एका माहितीनुसार 2022 मधील T20 विश्वचषक खेळण्याची ख्रिस गेलची इच्छा आहे.
Your tweet was quoted in an article by Insidesport https://t.co/a8ZTInDZVi
— Recite Social (@ReciteSocial) November 6, 2021
इतर बातम्या :
भारतीय खेळाडूचा ऑस्ट्रेलियात धमाका, अखेरच्या षटकात षटकारांचा पाऊस, 10 चेंडूत अर्धशतक!
तेरी जित मेरी जित, तेरी हार मेरी हार… NZ vs AFG सामन्यात भारतीय फॅन्सचा अफगाणिस्तानला पाठिंबा
(cricket news aus vs wi t20 world cup 2021 chris gayle possible to retire after west indies and australia match)