Mark Boucher ला मोठा दिलासा, वर्णभेदासह सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने चौकशी केली. त्यानंतर मार्क बाउचरची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावरील सर्व आरोप हटवण्यात आले आहेत.
डरबन: क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून (Cricket South Africa) माजी क्रिकेटपटू मार्क बाउचरला (Mark Boucher) मोठा दिलासा मिळाला आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने मार्क बाउचरची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. मार्क बाउचर दक्षिण आफ्रिकेच्या मेस टीमचे हेड कोच आहेत. मार्क बाउचरवर वर्णभेदाचा (Racism) आरोप करण्यात आला होता. मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात मार्क बाउचरवर हे आरोप करण्यात आले होते. 235 पानी आरोपांच्या रिपोर्टमध्ये फक्त मार्क बाउचरच नाही, तर ग्रॅम स्मिथ, एबी डिविलयर्स यांची सुद्धा नाव होती. स्मिथची आधीच या प्रकरणात सुटका झाली आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने चौकशी केली. त्यानंतर मार्क बाउचरची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावरील सर्व आरोप हटवण्यात आले आहेत. अनेक गोष्टी लक्षात घेऊन क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने हा निर्णय घेतला आहे.
The Board of CSA has formally and unreservedly withdrawn all charges against Proteas head coach Mark Boucher
Full statement ➡️ https://t.co/mLzJNQtvza pic.twitter.com/tz2GDKRSdF
— Cricket South Africa (@OfficialCSA) May 10, 2022
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या CEO नी काय म्हटलं?
“बाउचरवर जे आरोप झाले, त्यामुळे त्याला किती त्रास झाला असेल, याची आम्हाला कल्पना आहे. आम्हाला याबद्दल खंत वाटते. मार्क बाउचरच्या कोचिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मेस टीमने कमालीचं प्रदर्शन केलं आहे. खासकरुन कसोटी क्रिकेटमध्ये चांगला खेळ दाखवला आहे. बाउचर आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफशिवाय हे शक्य नव्हतं” असं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या CEO नी म्हटलं आहे.