Cricket | आजपासून चिन्नास्वामी स्टेडियम प्रकाशझोतात, भारत-श्रीलंकेची दुसरी कसोटी, 71व्या शतकाची प्रतीक्षा संपणार?
बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियम आजपासून प्रकाशझोतात असणार आहे. त्याला दोन विशेष गोष्टी आहते. एक म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या मैदानात रंगणार आहे. तर दुसरी गोष्ट विराटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न त्याला पूर्ण करता येऊ शकतं.
बंगळूरु : आजपासून चिन्नास्वामी स्टेडियण (Chennamma stadium) प्रकाशझोतात असणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना बंगळुरुच्या (Bengaluru) मैदानात आज रंगणार आहे. आजपासून बंगळुरुच्या (Bangalore) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणाऱ्या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात विशेष म्हणजे 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. तर यात एक दुग्धशर्करा योग आहे. विराट कोलहीनं (Virat kohli)कारकीर्दीतील 70वं शतक झळकावलंय. ते देखील प्रकाशझोतातील कसोटीमध्ये. नोव्हेंबर 2019मध्ये झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारतानं एक डाव आणि 46 धावांनी यशोशिखर गाठलं होतं. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतकापासून दूर राहिला होता. आता यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल वातावरण आहे.
अक्षरचं पारडं जड
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामन्यासाठी 11 खेळाडूंची निवड करताना फिरकीपटू जयंत यादवच्या ऐवजी अष्टपैलू अक्षर पटेल किंवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहालीत श्रीलंकेचे फलंदाज झगडत असताना फिरकीपटू जयंत यादव हा प्रभाव पाडू शकला नाही. जयंतला दोन डावांच्या 17 षटकांमध्ये एकही बळी मिळाला नाही. तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये अक्षर पटेल यानं 11 बळी मिळवले होते. त्यामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामन्यात अक्षरचं पारडं जड मानलं जातंय.
लाहिरू कुमाराची उणीव
अँजेलो मॅथ्यूजही मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला आहे. पहिल्या डावामध्ये पथुम निसंकाने नाबाद 61 धावा काढल्या होत्या. तर दुसरीकडे निरोशान डिक्वेलानं नाबाद 51 धावा त्यावेळी काढल्या. मोहालीमध्ये चेतेश्वर पुजाराच्या तिसऱ्या आणि अजिंक्य रहाणेच्या पाचव्या स्थानावर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी दावेदारी पक्की केली आहे. तर दुसरीकडे गुडघ्याच्या दुखापतीमुळे श्रीलंकेला वेगवान गोलंदाज लाहिरू कुमारा खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याची उणीव भासत आहे.
इतर बातम्या