Cricketer death : शेवटची मॅच ठरली, मैदानातच युवा क्रिकेटरच हार्ट अटॅकने संपलं आयुष्य

Cricketer death : क्रिकेटचा सामना सुरु असताना, अचानक एखादा खेळाडू मैदानात कोसळतो. मैदानात किंवा मैदानातून रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू होतो.

Cricketer death : शेवटची मॅच ठरली, मैदानातच युवा क्रिकेटरच हार्ट अटॅकने संपलं आयुष्य
cricketer death
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 11:39 AM

अहमदाबाद : क्रिकेट खेळताना आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. क्रिकेटचा सामना सुरु असताना, अचानक एखादा खेळाडू मैदानात कोसळतो. मैदानात किंवा मैदानातून रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्याचा मृत्यू होतो. अशा अचानक होणाऱ्या मृत्यूमागे हार्ट अटॅक किंवा कार्डियक अरेस्ट अशी कारण असतात. अहमदाबादमध्ये शनिवारी अशीच एक दुर्देवी घटना घडली. वरिष्ठ क्लर्क वसंत राठोड यांचा क्रिकेटच्या मैदानात मृत्यू झाला. ते 34 वर्षांचे होते. राज्य वस्तू आणि सेवा कर विभागात वसंत राठोड कार्यरत होते. अहमदाबाद जवळच्या भादज येथील डेंटल कॉलेजच्या मैदानात ही घटना घडली.

10 दिवसातील तिसरी घटना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 10 दिवसांच्या आत घडलेली अशी तिसरी घटना आहे. “मॅचमध्ये राठोड यांची टीम फिल्डिंग करत होती. बॉलिंग करताना वसंत व्यवस्थित वाटत होते. अचानक एकाएकी त्यांच्या छातीत दु:ख लागलं व ते मैदानात कोसळले. लगचेच सहकारी खेळाडू त्याच्यादिशेने धावले” वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

ऑक्सिजनची पातळी कमी झाली

राठोड यांना लगेच सामना सुरु असलेल्या डेंटल कॉलेजमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं. तिथे त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सातत्याने घसरत होती. त्यांना लगेच सोला येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत राठोड हे वस्त्रापूरचे रहिवाशी होते. अहमदाबादच्या SGST खात्यात ते नोकरीला होते, त्यांच्या पश्चात पत्नी आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

क्रिकेट खेळल्यानंतर छातीत दुखू लागलं

आठवड्याभरापूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रशांत भारोलिया (27) आणि जिग्नेश चौहान (31) यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. प्रशांत राजकोटचे तर जिग्नेश सूरतचा रहिवासी होता. क्रिकेट खेळल्यानंतर दोघांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. उपचारादरम्यान त्यांना चक्कर आली व त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूमागे कारण काय?

कार्डियक अरेस्टमुळे युवकांचा अचानक मृत्यू होण्याच प्रमाण वाढल्याच निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवल आहे. “जास्त दगदग, हायपर टेन्शन ही कारण त्यामागे आहेत. त्याशिवाय नियमित तपासणी केली जात नाही. त्यामुळे आजाराची कल्पना नसते. अलीकडे घडलेल्या या घटनांमध्ये मृत्यूच नेमकं कारण व्यवस्थित वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच समजेल” असं एका ह्दयरोग तज्ञाने सांगितलं.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.