धोनीचा जबरा फॅन, भेटण्यासाठी पार केलं तब्बल 1400 किमीचं पायी अंतर, धोनी भेटणार का?
क्रिकेटपटू हे भारतीयासांठी फक्त खेळाडू नसून त्यांचे 'हिरो' असतात. अनेकजण केवळ आपल्या आवडत्या खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी आकाश-जमीन एक करतात. एका धोनी फॅननेही असंच काही केलं आहे, ज्याची चर्चा सर्वत्र आहे.
रांची : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याचे लाखो चाहते आहेत. अनेकदा मैदानात सामना सुरु असताना पळत येऊन धोनीला मीठी मारणारे, तर कधी पाया पडणारे अनेक जण दिसले आहेत. पण धोनीचा एक चाहता तर धोनी भेटण्यासाठी थेट हरयाणावरुन रांची पायी चालत पोहोचला आहे. तब्बल 1400 किमीहून अधिकचं अंतर पार करणाऱ्या या धोनीच्या जबरा फॅनचं नाव अजय गिल असून तो हरयाणाच्या जलान खेडा येथील रहिवाशी आहे.
हातात तिरंगा आणि खांद्यावर क्रिकेट किट घेऊन अजयने 16 दिवसांत तब्बल 1 हजार 436 किलोमीटर अंतर पायी चालत पूर्ण केलं. अजय हा धोनीला भेटूनच माघारी जाणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. विशेष म्हणजे अजय क्रिकेट देखील खेळतो. पण मागील वर्षी धोनी आंतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अजयनेही क्रिकेट खेळणं सोडून दिलं आहे. धोनीला भेटून त्याचा आशीर्वाद घेऊनच पुन्हा क्रिकेट सुरु करणार असं अजयनं म्हटलं आहे.
धोनी मात्र चेन्नईत
तब्बल 16 दिवस पायी प्रवास करुन आलेल्या अजयला भेटण्यासाठी धोनी 10 मिनिटांचा वेळ काढणार का? असा प्रश्न साऱ्यानांच पडला आहे. पण अजयच्या दुर्देवाने धोनी सध्या रांचीत नसून चेन्नईला आहे. आगामी आयपीएल (IPL 2021) स्पर्धेसाठी चेन्नई सुपरकिंग संघोसोबत (CSK) धोनी युएईला रवाना होणार असल्याने. तो चेन्नईत आहे. त्यामुळे सध्यातरी तो अजयला भेटणं कठीण वाटत आहे.
हे ही वाचा
IND vs ENG : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, दुसऱ्या कसोटीत भारताचा दबदबा
(Cricketer MS Dhoni fan walks 1400 km to meet Dhoni at ranchi)