IPL 2021: CSK ने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवरुन सुरेश रैना ट्रोल, फॅन्स म्हणतायेत ‘वजन कमी कर!’

आयपीएलचे उर्वरीत सामने सुरु होण्यासाठी अगदी महिन्यांभराहून कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू जोमात सरावाला लागले असून चेन्नईचा संघ सर्वात आधी युएईला पोहोचला आहे.

IPL 2021: CSK ने शेअर केलेल्या 'त्या' फोटोवरुन सुरेश रैना ट्रोल, फॅन्स म्हणतायेत 'वजन कमी कर!'
सुरेश रैना
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 6:49 PM

दुबई : आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचं प्रदर्शन अत्यंत निराशाजनक होतं. पण यंदाच्या आतापर्यंत झालेल्या सीजनमध्ये चेन्नईचा संघ पुन्हा आपल्या रंगात दिसून आला. याला कारण म्हणा किंवा योगायोग पण संघातील लाडका आणि प्रमुख खेळाडू सुरैश रैना (Suresh Raina) संघात परत आला आणि यंदाच्या सीजनमध्ये संघ पुन्हा आपल्या रंगात दिसून आला. पण संघाचा हाच प्रमुख खेळाडू एका फोटोमुळे ट्रोल होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. ज्यामध्ये संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), सुरेश रैना, ऋतुराज गायकवाडसह सपोर्ट स्टाफमधील सदस्य आणि प्रशिक्षक मायकल हसी असे सगळेच दिसून येत आहेत. यात सुरेश रैनाही एक झकास स्माईल देताना त्याचा फोटो आहे. पण याच फोटोवरुन त्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

सुरेश रैना झाला ट्रोल

चेन्नई सुपरकिंग्सने शेअर केलेल्या फोटोला  ‘चिन्ना तुमच्यासाठी हसताना’ असं कॅप्शन दिलं आहे. चेन्नईचे फॅन्स लाडाने रैनाला चिन्ना म्हणातात. पण या फोटोत रैनाची स्माईल क्यूट असली तरी त्याचा फिटनेस मात्र चांगला नसल्याने फोटोवर चेन्नईचे चाहते रैनाला ट्रोल करत वजन कमी करण्याचाही सल्ला देत आहेत. तसेच फिटनेसवर लक्ष दे, जीमला जा असे सल्लेही देत आहेत.

चेन्नईच्या संघाने लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याच्यासह सर्व खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु केला आहे.  दरम्यान व्यायाम म्हणून तसेच काही वेगळं म्हणून चेन्नईच्या खेळाडूंनी सरावादरम्यान थेट फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ट्विटर हँडलवरुन 3-4 फोटो टाकले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनी आणि त्याचे साथीदार फुटबॉल खेळताना दिसत आहेत.

इतर बातम्या

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

(Cricketer Suresh raina trolled for being unfit in recent Photo which CSK shared on twitter)

Non Stop LIVE Update
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.