CSA T20 League: बटलर-लिव्हिंगस्टोनला मिळणार सर्वात जास्त पैसा, जाणून घ्या कोण किती कमावणार?
दक्षिण आफ्रिकेत नवीन फ्रेंचायजी आधारीत टी 20 लीग पुढच्यावर्षीपासून सुरु होत आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाची या लीगला मान्यता आहे. आयपीएल मधील 6 फ्रेंचायजी मालकांनी या लीग मधील सर्व संघ विकत घेतले आहेत.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेत नवीन फ्रेंचायजी आधारीत टी 20 लीग पुढच्यावर्षीपासून सुरु होत आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाची या लीगला मान्यता आहे. आयपीएल मधील 6 फ्रेंचायजी मालकांनी या लीग मधील सर्व संघ विकत घेतले आहेत. या लीग मध्ये मोठ-मोठे खेळाडू खेळणार असून त्यांची नाव आता समोर येऊ लागली आहेत. CSA ने दिलेल्या माहितीनुसार, 30 खेळाडूंचा मार्की प्लेयर मध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांची 19 सॅलरी ब्रॅकेट मध्ये विभागणी करण्यात आली आहे. यात खेळाडूला सर्वाधिक 4 कोटी आणि सर्वात कमी 24 लाख रुपये मिळणार आहेत.
बटलर-लिव्हिगस्टोनला मिळणार सर्वात जास्त सॅलरी
क्रिकेट वेबसाइट इएसपीएन-क्रिकइन्फोच्या एका रिपोर्टनुसार, लीग मध्ये सर्वात जास्त सॅलरी 5 लाख अमेरिकन डॉलर आहे. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये त्याच मुल्य 4 कोटी रुपये आहे. सध्या फक्त दोनच खेळाडूंना इतका पैसा मिळणार आहे. इंग्लंडच्या टी 20 टीमचा कॅप्टन जोस बटलर आणि इंग्लंडचाच स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन. या दोघांना 5 लाख डॉलरच्या सॅलेरी ब्रॅकेट मध्ये ठेवण्यात आलं आहे. लिव्हिंगस्टोनला मुंबई इंडियन्सच्या केपटाऊन फ्रेंचायजीने करारबद्ध केलं आहे.
मुंबईने राशिद खानलाही करारबद्ध केलं आहे. पण त्याला किती पैसा मिळणार, ते अजून स्पष्ट केलेलं नाही. त्याचा सुद्धा टॉप ब्रॅकेट मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या एकूण 11 खेळाडूंना मार्की प्लेयर म्हणून लीग साठी साइन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर भरपूर पैसे खर्च करण्यात आले आहेत. 5 लाख डॉलर नंतर 4 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी रुपयांच ब्रॅकेट आहे.
डुप्लेसी सर्वात महागडा आफ्रिकी खेळाडू
चेन्नई सुपर किंग्सची फ्रेंचायजी जोहान्सबर्गने माजी आफ्रिकी कर्णधार फाफ डुप्लेसीला आपल्यासोबत जोडलं आहे. डुप्लेसीला 3 कोटी रुपये सॅलरी मिळेल. सध्या तो सर्वात तगडी रक्कम घेणारा आफ्रिकन क्रिकेटपटू आहे. त्याशिवाय कगिसो रबाडा आणि क्विंटन डि कॉक, इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन आणि युवा ऑलराऊंडर सॅम करन 3 लाख डॉलर कमावणार आहेत.
खेळाडूंना करारबद्ध करण्याचा फॉर्मेट कसा आहे?
CSA ने अलीकडेच माहिती दिली की, एकूण 30 मार्की खेळाडू लीगशी जोडले गेले आहेत. त्याशिवाय प्रत्येक संघात 17 खेळाडू असतील. संघ बनवण्यासाठी खेळाडूंचा लिलाव होईल. त्याआधी प्रत्येक फ्रेंचायजीला 5 खेळाडूंना करारबद्ध करण्याची परवानगी असेल. यात 3 परदेशी खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा एक खेळाडू आणि दुसरा अनकॅप्ड दक्षिण आफ्रिकन खेळाडू असेल.