VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो ‘पिक्चर अभी बाकी है’

कोरोनाच्या संकटामुळे मध्येच थांबवण्यात आलेल्या उर्वरीत आयपीएलला19 सप्टेंबरपासून युएईत सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग या सर्वोत्तम संघात होणार आहे.

VIDEO : कॅप्टन कूल धोनी बनला रॉकस्टार, उर्वरीत IPL ची दणकेबाज घोषणा, म्हणतो 'पिक्चर अभी बाकी है'
एम एस धोनी
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 8:28 PM

मुंबई : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा इंडियन प्रीमियर लीगचा (Indian premier league) 14 वा सीजन कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात मध्येच थांबवण्यात आला होता. आता 19 सप्टेंबरपासून उर्वरीत हंगामाला पुन्हा सुरुवात होणार असून स्पर्धेची तयारी जोरदार स्वरुपात सुरु झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळे उर्वरीत स्पर्धा युएईत होणार आहे.  तीन वेळा विजयी झालेला संघ चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) सर्वात आधी युएईत पोहोचत सरावाला सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ देखील युएईत पोहोचला असून इतर संघाचे देखील काही खेळाडू युएईमध्ये पोहोचले आहेत. सध्या पुन्हा सर्वत्र आयपीएलचे वारे वाहू लागले असताना आयपीएलने उर्वरीत आयपीएला उद्देशून एक धांसू गाणं काढलं असून यामध्ये कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) रॉकस्टार होऊन नाचताना दिसत आहे.

आयपीएलने त्याच्या अधिकृत ट्विटरवर हा म्यूजिक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये धोनी अगदी रंगीबेरंगी कपडे घालून नाचत आहे. धोनीची हेयरस्टायल देखील अगदी वेगळी आहे. केसांनाही त्याने रंग दिला असून तो एका चाळीत डान्स करताना दिसत आहे. याठिकाणी उर्वरीत आयपीएलच्या सीजनबद्दल तो गाण्यातून सांगत असून अखेरीस ‘पहला हाफ तो सिर्फ झांकी था आयपीएल के दूसरे हाफ की पिक्चर अभी बाकी है” असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा आणखी शिगेला पोहचवत आहे.

आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक

मे महिन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने 3 मे रोजीचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर 4 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा  स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने 4 मे रोजी घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी उर्वरीत आयपीएल युएईत घेणार असल्याची माहिती दिली होती. ज्यानंतर आणखी काही दिवसांनी आयपीएलची तारीख आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं.

उर्वरीत आयपीएल 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 20 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 21 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS कोलकाता नाइट रायडर्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 24 सप्टेंबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स VS राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 25 सप्टेंबर – सनयारझर्स हैदराबाद VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शाहजाह 26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्स VS कोलकाता नाईट रायडर्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 26 सप्टेंबर – पंजाब किंग्स VS मुंबई इंडियन्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 27 सप्टेंबर- सनरायझर्स हैदराबाद VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 28 सप्टेंबर – कोलकाता नाइट रायडर्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 28 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 30 सप्टेंबर – सनरायझर्स हैदराबाद VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 1 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS पंजाब किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 2 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 3 ऑक्टोबर – पंजाब किंग्स VS रॉयल चँलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून – शारजाह 3 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स VS चेन्नई सुपर किंग्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 5 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 6 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS सनरायझर्स हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – अबू धाबी 7 ऑक्टोबर – चेन्नई सुपर किंग्स VS पंजाब किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – दुबई 7 ऑक्टोबर – कोलकाता नाइट रायडर्स VS राजस्थान रॉयल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 8 ऑक्टोबर – सनरायझर्स हैदराबाद VS मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून – अबू धाबी 8 ऑक्टोबर – रॉयल चँलेंजर्स बंगळुरू VS दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 10 ऑक्टोबर – क्वालिफायर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई 11 ऑक्टोबर – एलिमिनेटर, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 13 ऑक्टोबर – क्वालिफायर 2, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – शारजाह 15 ऑक्टोबर- अंतिम सामना, संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून – दुबई

इतर बातम्या

तब्बल 65 दिवसांनी पत्नीला भेटल्यानंतर सूर्यकुमार खुश, VIDEO शेअर करत व्यक्त केला आनंद

Video: उडे जब जब झुल्फें तेरी, पोरींचा घोळका झूम मिटींगवरच नीरज चोप्रासमोर नाचायला लागला

गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या आवडी-निवडी, आवडता डायलॉग आणि अभिनेत्याबद्दल बोलताना म्हणाला..

(CSK captain Mahendra singh dhoni in IPL phase 2 new theme song became rockstar)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.