MS Dhoni Surgery : धोनीला अचानक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कधीपर्यंत फिट होणार? कधीपर्यंत पळू शकतो?

MS Dhoni Surgery : धोनीला पूर्णपणे फिट होऊन आपल्यासमोर येण्यासाठी किती महिने लागणार? मुंबईत धोनीवर ऑपरेशन सुरु असताना तिथे त्याच्यासोबत कोण होतं?. एमएस धोनीने दुखापत असूनही चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन बनवलं.

MS Dhoni Surgery : धोनीला अचानक हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, कधीपर्यंत फिट होणार? कधीपर्यंत पळू शकतो?
MS dhoni Image Credit source: ipl
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 7:32 AM

मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि CSK चा कॅप्टन MS dhoni च्या गुडघ्यावर गुरुवारी शस्त्रक्रिया झाली. IPL 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये एमएस धोनी गुडघे दुखापतीने त्रस्त होता. धोनी गुडघ्याची कॅप घालून मैदानात उतरायचा व त्याने चेन्नईला चॅम्पियन बनवलं. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने गुजरात टायटन्सवर विजय मिळवला. सीएसकेची टीम या विजयाच सेलिब्रेशन करत असताना, धोनी आपल्या कुटुंबासह मुंबईत दाखल झाला. तिथे त्याच्या गुडघ्यावर ऑपरेशन झालं.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 5 व्यां दा आयपीएल ट्रॉफी जिंकली. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांची बरोबरी केली.

कुठे झालं ऑपरेशन?

मुंबईच्या प्रसिद्ध कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये धोनीच्या दुखऱ्या गुडघ्यावर ऑपरेशन झालं. या ऑपरेशन नंतर धोनीला काही दिवस रुगालयात रहाव लागेल असं वाटलं होतं. पण धोनीला डॉक्टरांनी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.

CSK सीईओ काय म्हणाले?

धोनीवरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. आधी अशी बातमी आली होती की, सर्जरीनंतर त्याला दोन दिवस रुग्णालयात रहाव लागेल. पण आता मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी उशिरा त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. क्रिकबजच्या वृत्तानुसार, धोनीला रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. “शस्त्रक्रियेनंतर सकाळी धोनीशी बोलणं झालं. तो व्यवस्थित वाटत होता” असं सीएसकेचे साीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितलं,

धोनी कधीपर्यंत पळणार?

कोकिलाबेन हॉस्पिटलमध्य डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी धोनीवर शस्त्रक्रिया केली. त्यांनीच ऋषभ पंतवर सुद्धा शस्त्रक्रिया केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार धोनीला फिट होण्यासाठी दोन महिने लागतील. त्यानंतर तो पळू शकतो. ऑपरेशनच्यावेळी धोनीसोबत कोण होतं?

धोनीने चेन्नईच्या फॅन्सना विश्वास दिलाय की, तो पुढच्यावर्षी पुन्हा खेळेल. धोनीचा फिटनेस पाहता, त्याला पुढचा आयपीएल सीजन खेळणं कितपत जमेल, याबद्दल शंका आहे. धोनीवर ऑपरेशन झालं, त्यावेळी त्याची पत्नी साक्षी सोबत होती.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.