MS Dhoni | धोनीने एक चान्स दिला नाही, ‘त्या’ बॅट्समनने आता बॅट चालवून टीम मॅनेजमेंटला दिलं उत्तर
MS Dhoni | दिग्गज महेंद्र सिंह धोनीने आपल्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडूंना संधी दिली आहे. पण असेही काही खेळाडू आहेत, जे धोनीच्या नेतृत्वात कधी मॅच खेळू शकले नाहीत. अशाच एका प्लेयरला संधी मिळाली नाही.
मुंबई : दिग्गज एमएस धोनीने आपल्या कॅप्टनशिपमध्ये अनेक खेळाडूंना संधी दिली. पण असे सुद्धा काही खेळाडू होते, जे धोनीच्या नेतृत्वात कधी खेळू शकले नाहीत. एक असा खेळाडू आहे, जो धोनीच्या टीममध्ये असूनही कधी मैदानावर उतरला नाही. आता हाच फलंदाज दुलीप ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. ज्या फलंदाजाबद्दल बोलतोय तो आहे, चेन्नई सुपर किंग्सचा युवा फलंदाज निशांत सिंधु.
निशांतने दुलीप ट्रॉफीच्या मॅचमध्ये आपल्या बॅटने कमाल दाखवलीय. निशांत सिंधुची चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये निवड झाली होती. पण मागच्या सीजनमध्ये त्याला एकाही मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.
ध्रुवचा शानदार फॉर्म
ध्रुव शोरेने संयमाने शतकी खेळी केली. त्या बळावर नॉर्थ झोनने बुधवारी नॉर्थ ईस्ट झोन विरोधात क्वार्टर फायनलच्या पहिल्यादिवशी स्टम्पपर्यंत 87 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 306 धावा केल्या. निशांत सिंधू नाबाद 76 धावांची अर्धशतकी इनिंग खेळला. दिल्लीचा खेळाडू ध्रुव शानदार फॉर्ममध्ये आहे. त्याने हीच लय कायम ठेवली. 2022-23 च्या रणजी सत्रात सात सामन्यात 95.44 च्या सरासरीने त्याने 859 धावा केल्या होत्या. यात तीन सेंच्युरी आहेत.
15 ओव्हरमध्ये फक्त 29 धावा
ध्रुवने खेळपट्टीवर पाय रोवण्यासाठी काही वेळ घेतला. जोतिन सिंह, पालजोर तमांग आणि दिप्पू संगमा यांची गोलंदाजी सावधपणे खेळून काढली. नॉर्थ ईस्टच्या वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून काही मदत मिळत होती. पण ते ध्रुव आणि ओपनर प्रशांत चोपडा यांना बाद करु शकले नाहीत. पहिल्या 15 ओव्हरमध्ये नॉर्थ झोनच्या टीमने फक्त 29 धावा केल्या.
जोतिननची चेंडूने कमाल
नॉर्थ झोनने लंचपर्यंत 34 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 115 धावा केल्या होत्या. फलंदाजाच्या चुकीमुळे या दोन्ही विकेट पडल्या. चोपडाने जोतिनचा चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो बाद झाला. अंकित कलसीला सुद्धा जोतिनचा चेंडू समजला नाही. तो सुद्धा शुन्यावर बाद होऊन तंबूत परतला. लंचनंतर पूर्वोत्तरच्या टीमने 2 विकेट काढले. प्रभसिमरन सिंहने इमलीवती लेमतूरच्या विरोधात आक्रमक होण्याचा प्रयत्न केला. पण त्याने किशन मिएतामला कॅच दिली. खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवला
काही वेळानंतर अंकित कुमारला संगमाने आऊट केलं. 46 ओव्हरमध्ये उत्तरे क्षेत्राचा स्कोर चार विकेटवर 162 धावा होता. ध्रुव आणि निशांतने पाचव्या विकेटसाठी 22 ओव्हरमध्ये 80 धावांची भागीदारी केली. त्यामुळे उत्तर क्षेत्रावरील दबाव थोडा कमी झाला. लेफ्ट आर्म स्पिनर किशन सिंघाने 2 चेंडूत 2 विकेट काढले. यात ध्रुव आणि कॅप्टन जयंत यादवचा विकेट आहे. टीमचा स्कोर 6 विकेटवर 242 धावा होता. 30 ओव्हर्सचा खेळ बाकी होता. पण खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला.