DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!

दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली आहे. त्याचबरोबर आज क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे.

DC vs CSK : चेन्नई नवव्यांदा फायनलमध्ये, धोनीने धुतलं, ऋतुराज-उथप्पाचा धमाका, दिल्ली हरली!
MS Dhoni
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 11:48 PM

दुबई : आयपीएल 2021 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामातील प्लेऑफ सामन्यांमधील पहिला सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात खेळवला गेला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली आहे. त्याचबरोबर आज क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. दिल्लीवर मात करत चेन्नईने फायनलचं तिकीट मिळवलं आहे. चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात नवव्यांदा फायनल गाठली आहे. (CSK Defeated DC in Playoffs, reached in Finals of IPL 2021, Ruturaj Gaikwad hits another Fifty)

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं आहे. सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. धोनीने त्याच्या आक्रमक शैलीत ही मॅच फिनिश केली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा जमवल्या.

नॉर्खियाने पहिल्याच षटकात फाफ डुप्लेसीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. त्यानंतर मात्र ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने संयमी खेळ करत चेन्नईचा डावाला आकार दिला. दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या. ऋतुराजने 50 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावा फटकावल्या. तर रॉबिन उथप्पाने 44 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावा चोपल्या. हे दोघे चेन्नईच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

दरम्यान, दिल्लीकडून गोलंदाजीत टॉम करनने चमक दाखवली. त्याने 3.4 षटकात 29 धावा देत 3 बळी घेतले. तर आवेश खान आणि एनरीच नॉर्खियाने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दिल्लीचा पहिला डाव

तत्पूर्वी, कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. परंतु धोनीच्या मनसुब्यांवर पृथ्वी शॉने पाणी फेरलं. पृथ्वी शॉने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा स्वीकारला होता. पृथ्वी शॉने 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 34 चेंडूत 60 धावा फटकावल्या, मात्र त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. सुरुवातीचे तीन फलंदाज लवकर बाद झाल्याने धावगती धिमी झाली होती. मात्र मधल्या षटकांमध्ये शिमरन हेटमायर आणि ऋषभ पंतने डाव सावरला. पंतने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. त्याने 35 चेंडूत 51 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. पृथ्वी शॉ आणि पंतच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर दिल्लीने चेन्नईसमोर 172 धावांचा डोंगर उभा केला.

चेन्नईकडून गोलंदाजीत जोश हेजलवूडने चांगली कामगिरी केली. त्याने त्याने 4 षटकात 29 धावा देत 2 बळी घेतले. तर रवींद्र जाडेजा आणि मोईन अली आणि ड्र्वेन ब्राव्होने प्रत्येकी एक गडी बाद केला.

इतर बातम्या

SRH मधून बाहेर पडलेल्या डेव्हिड वॉर्नरवर अनेक संघांच्या नजरा, लिलावाआधीच मिळतायत ऑफर्स

T20 वर्ल्ड कप विजेता, उपविजेता संघ होणार मालामाल, आयसीसीकडून बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा

आयर्लंडच्या फलंदाजाने विराट कोहलीला पछाडलं, खास विक्रम मोडित

(CSK Defeated DC in Playoffs, reached in Finals of IPL 2021, Ruturaj Gaikwad hits another Fifty)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.