IPL 2023 : CSK संकटात, MS Dhoni च्या टीम विरोधात कोर्टात खटला दाखल
IPL 2023 : MS Dhoni च्या CSK वर काय आरोप करण्यात आलेत?. एमएस धोनीच्या टीमच्या अडचणी वाढू शकतात. याआधी सीएसकेने बंदीचा सामना केला आहे. आत आयपीएल रंगतदार वळणावर असताना हा खटला दाखल करण्यात आला आहे.
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सची टीम प्लेऑफच्या दरवाजावर आहे. अजून एक जय-पराजय CSK टीमच IPL 2023 मधील प्लेऑफच भवितव्य ठरवणार आहे. प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी CSK ला आपली शेवटची मॅच जिंकावीच लागणार आहे. MS Dhoni च्या नेतृत्वाखाली सीएसकेची टीम आयपीएलमधील आपल्या शेवटच्या साखळी सामन्याची तयारी करतेय. या दरम्यान सीएसकेसाठी एक वाईट बातमी आहे. त्यामुळे एमएस धोनीच्या टीमच्या अडचणी वाढू शकतात. याआधी सीएसकेने बंदीचा सामना केला आहे.
एका स्थानिक वकिलाने चेन्नई सुपर किंग्स विरोधात कोर्टात खटला दाखल केला आहे. त्याने CSK, BCCI आणि तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनला कोर्टात खेचलय. 17 मे रोजीच्या तिकीट विक्रीत अनियमितता, गैरप्रकार झाल्याचा त्याचा आरोप आहे.
स्थानिक नागरिकांच्या मनात राग
चेन्नईच्या सिव्हील कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे. सीएसकेचे घरच्या मैदानावर सामने झाले. त्यात तिकीटांचा मोठा काळाबाजार झाल्याचा आरोप आहे. सीएसकेच्या सामन्यांची तिकीट काऊंटरवर आणि ऑनलाइन तिकीटं उपलब्ध नसल्यामुळे सीएसके आणि टीम मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यता आली होती. स्थानिक नागरिकांनी आपला राग व्यक्त केला.
वकील अशोक चक्रवर्ती काय म्हणाले?
“चेपॉकवरील सामन्यांच्या तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि काळाबाजार झाला. त्याविरोधात मी चेन्नई सुपर किंग्स, बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट असोशिएशन विरोधात कोर्टात खटला दाखल केलाय” असं वकील अशोक चक्रवर्ती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलय.
तिकीटांचे दर गगनाला भिडलेत
तिकीटं मिळत नसल्याने चेन्नईचे चाहते खूप नाराज झाले. लोअर स्टँडमधील तिकीटांची किंमत 1500 ते 2000 रुपयांच्या घरात असते. त्याची किंमत 8 हजार रुपये होती. एमएस धोनीच्या निवृत्तीच्या शक्यतेमुळे प्लेऑफच्या तिकीटांचे दर गगनाला भिडलेत. या सगळ्या मुद्यांचा याचिकेत समावेश आहे. पुढच्या आठवड्यात चेन्नईत प्लेऑफचे सामने होतील. त्या तिकीटांच्या विक्रीला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती कोर्टाला करण्यात आली आहे. आयपीएल 2023 च्या प्लेऑफ स्टेजमध्मये चेपॉकवर क्वालियफायर 1 आणि एलिमिनेटरचा सामना होणार आहे.