KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्याला सीएसकेचा दिग्गज खेळाडू मुकणार?, खराब फॉर्ममुळे संघ घेणार धक्कादायक निर्णय

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांच्यात आय़पीएलचा 2021 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ त्यांचे एकदम चांगल्या फॉर्ममध्ये असणारे खेळाडू घेऊनच खेळणार हे नक्की!

KKR vs CSK IPL Final : अंतिम सामन्याला सीएसकेचा दिग्गज खेळाडू मुकणार?, खराब फॉर्ममुळे संघ घेणार धक्कादायक निर्णय
चेन्नई सुपरकिंग्सचा संघ
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 11:43 PM

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या अंतिम सामना आता तासांवर येऊन ठेपला आहे.  शुक्रवारी (15 ऑक्टोबर) कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) हे युद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार आहे. या अखेरच्या आणि महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ आपली बेस्ट प्लेइंग 11 घेऊन खेळणार यात शंका नाही. त्यामुळे चेन्नईचा दिग्गज खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) जो यंदा खास फॉर्ममध्ये नसल्याने या सामन्याला तो मुकण्याची दाट शक्यता आहे. मागील काही सामने तो संघात याच कारणामुळे नसल्याचे दिसून येत आहे.

सुरेश रैना याला मिस्टर आय़पीएल म्हटलं जात. चेन्नईला तीन वेळा चॅम्पियन बनवण्यात रैनाचा मोठा हात आहे. मात्र यंदा त्याचा फॉर्म अतिशय खराब असल्याचं दिसत आहे. यंदाच्या पर्वात त्याने 12 सामन्यात 17.77 च्या सरासरीने केवळ 160 धावाच केल्या आहेत. त्यामुळे मागील तीन सामने तो संघात नसून त्याच्या जागी रॉबिन उथप्पा याला स्थान दिले जात आहे.

उथप्पाच फायनल खेळण्याची दाट शक्यता

रैनाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या उथप्पाने दिल्ली विरुद्ध क्वॉलिफायरमध्ये उत्कृष्ट अर्धशतक ठोकल्यामुळे तोच अंतिम सामन्यातही संघात असण्याची दाट शक्यता आहे. त्याने या महत्त्वाच्या सामन्यात 44 चेंडूत 63 धावा केल्या. यावेळी 2 षटकारांसह त्याने 7 चौकारही लगावले.

चेन्नईला त्रिकुटाचा धोका

उद्याच्या सामन्यात चेन्नईचं पारडं जड असलं तरी केकेआरचे तीन खेळाडू चेन्नसाठी फार धोकादायक आहेत. हे त्रिकुट म्हणजे सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती आणि शाकिब अल् हसन. या तिघा फिरकीपटूंनी आतापर्यंत आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे भारताचा युवा गोलंदाद वरुण यानेतर सर्वात बेस्ट फिरकी गोलंदाजी यंदाच्या पर्वात केली आहे. त्याच जोरावर त्याची आगामी टी20 विश्व चषकासाठीही निवड झाली आहे. तिघांच्या इकॉनोमीचा विचार करता वरुणची इकॉनोमी सर्वात कमी म्हणजे 6.40, त्यानंतर सुनीलची 6.44 आणि अखेर शाकिबची इकॉनोमी 6.64 इतकी आहे. दरम्यान टी20 प्रकारात 7 पेक्षा कमी इकॉनोमी म्हणजे उत्कृष्ट असल्याने सीएसकेची डोकेदुखी वाढली आहे.

IPL 2021 Final साठी सीएसकेचा संभाव्य अंतिम 11 – फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.

हे ही वाचा

मोठी बातमी: T20 World Cup 2021 नंतर विराट आणि रोहित संघाबाहेर, युवा खेळाडूंना मिळणार संधी

KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ

T20 World Cup मधल्या सिक्सर किंग्सची यादी, टॉप 5 मध्ये भारताचा एकमेव खेळाडू

(CSK Legend Suresh Raina May not play IPL 2021 Final Match between KKR vs CSK)

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.