IPL 2025 : सीएसकेच्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्रसिंह धोनी, स्पर्धेदरम्यान मोठा निर्णय, Ruturaj Gaikwad आऊट
Chennai Super Kings : चेन्नई सुपर किंग्सला मोठा झटका लागला आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात 9 एप्रिलपर्यंत एकूण 23 सामने खेळवण्यात आले आहेत. या हंगामातील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. त्याआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नई सुपर किंग्स टीमच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी उर्वरित सामन्यात चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. याबाबतची माहिती सीएसके हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली आहे.
ऋतुराजला नक्की काय झालं?
ऋतुराजला कोपऱ्याच्या फ्रॅक्चरमुळे या 18 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागल्याची माहिती स्टीफन फ्लेमिंग यांनी दिली. ऋतुराजला ही दुखापत 30 मार्चला झाली होती. राजस्थान विरुद्ध चेन्नई यांच्यात सामना खेळवण्यात आला होता. ऋतुराजला या सामन्यात कल्याणच्या तुषार देशपांडेच्या बॉलिंगवर दुखापत झाली होती. तुषारने टाकलेला बॉल ऋतुराज इतका जोरात लागला की तो थेट खाली बसला. त्यानंतर ऋतुराजर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र वैद्यकीय पथकाच्या अनेक प्रयत्नांना काही यश आलं नाही. अखेर ऋतुराजला 10 दिवसांनी या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.
चेन्नईची दुरावस्था
दरम्यान चेन्नईची या हंगामात फार वाईट अवस्था झालेली आहे. चेन्नईने आतापर्यंत एकूण 5 सामने खेळले आहेत. चेन्नईने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करत दण्यात सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नईला सलग 4 सामने गमवावे लागले. त्यामुळे आता कर्णधार धोनीसमोर चेन्नईला पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आणण्याचं आव्हान असणार आहे.
चेन्नईला मोठा झटका
Due to injury, Ruturaj Gaikwad is out of the entire IPL tournament and MS Dhoni will take over as captain for the rest of the game: CSK Coach Stephen Fleming
(File photos – IPL) pic.twitter.com/0XnWRecHoF
— ANI (@ANI) April 10, 2025
चेन्नई सुपर किंग्ज संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर) (कर्णधार), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.