CSK vs GT IPL 2022: जॉर्डनची धुलाई, जाडेजा बाउंड्रीवर उभा राहून बघत होता तमाशा, CSK चा खरा कॅप्टन कोण?

CSK vs GT IPL 2022: IPL 2022 मध्ये काल गुजरात टायटन्सने आणखी एक विजय मिळवला. पहिल्यांदाच या लीगमध्ये खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ पाच विजयांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे.

CSK vs GT IPL 2022: जॉर्डनची धुलाई, जाडेजा बाउंड्रीवर उभा राहून बघत होता तमाशा, CSK चा खरा कॅप्टन कोण?
रवींद्र जाडेजा-एमएस धोनी Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 3:33 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये काल गुजरात टायटन्सने आणखी एक विजय मिळवला. पहिल्यांदाच या लीगमध्ये खेळणारा गुजरात टायटन्सचा संघ पाच विजयांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. गुजरात टायटन्सने काल चार वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्सला (CSK vs GT) तीन विकेटने नमवलं. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. डेविड मिलर (David Miller) नाबाद 94 आणि राशिद खानच्या 40 धावांच्या बळावर गुजरातने एका रोमांचक विजयाची नोंद केली. एकवेळ या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा संघ सहज विजय मिळवेल असं वाटत होतं. 13 ओव्हर्समध्ये गुजरातचा निम्मा संघ तंबूत परतला होता. पण त्यानंतरही रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला. चेन्नईच्या पराभवानंतर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन कोण आहे? रवींद्र जाडेजा की, आणखी कोण?.

जाडेजा लांब बाऊंड्रीवर उभा होता

गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रवींद्र जाडेजा सीमारेषेवर फिल्डिंग करताना दिसला. धोनी फिल्ड सेट करत होता. ख्रिस जॉर्डनला समजावत होता. शेवटच्या षटकात मोइन अली आणि ड्वेयन ब्राोव्हो ख्रिस जॉर्डनशी चर्चा करताना दिसले. त्यावेळी जाडेजा लांब बाऊंड्रीवर उभा राहून हे सर्व पहात होता.

फक्त डमी कॅप्टन आहे का?

रवींद्रा जाडेजा चेन्नई सुपर किंग्समध्ये फक्त डमी कॅप्टन आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाची धुलाई होते, संघ अडचणीत असतो, त्यावेळी कॅप्टन संवाद साधण्यासाठी धाव घेताना दिसतो. पण इथे जाडेजा अन्य खेळाडूंप्रमाणे सीमारेषेवर उभा होता. धोनीने आय़पीएल 2022 सुरु होण्याआधी कॅप्टनशिप सोडली होती. जाडेजाकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. पण ग्राऊंडवर जाडेजा कधी कॅप्टनच्या रोलमध्ये दिसलाच नाही. जाडेजा टॉस आणि सामना संपल्यावर बोलायला जरुर येतो.

शेवटच्या पाच षटकात सर्व बिघडलं

डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नाही. त्याचा फटका संघाला बसला, असं जाडेजाने सामना संपल्यानंतर सांगितलं. “आम्ही चांगली सुरुवात केली होती. पहिल्या सहा षटकात चांगली गोलंदाजी झाली. पण डेविड मिलरला श्रेय जातं. त्याने चांगली फलंदाजी केली. आम्ही बॅटिंग करत असताना, बॉल थांबून येत होता. त्यामुळे 169 पुरेशी धावसंख्या आहे, असं आम्हाला वाटलं. शेवटच्या पाच षटकात आम्ही योजनेनुसार खेळा केला नाही” असं रवींद्र जाडेजाने सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.