MS Dhoni Catch : कोण म्हणेल धोनीच वय झालं, एकदा ही कॅच बघा Video, त्याच्या निवृत्तीचा विचार म्हणजे गुन्हाच
CSK VS GT : IPL 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये सातवा सामना झाला. धोनीला या मॅचमध्ये बॅटिंगची संधी नाही मिळाली. पण धोनीने विकेटकीपिंगमध्ये आपला जलवा दाखवला. त्याने एका आश्चर्यकारक झेल पकडला.
एमएस धोनी आता 42 वर्षांचा आहे. आयपीएलचा हा 17 वा सीजन आहे. धोनीने या सीजनमध्ये टीमच नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. धोनीच वाढत वय लक्षात घेऊन त्याने हा निर्णय घेतला असावा. अशी सुद्धा चर्चा आहे की, धोनी या सीजननंतर निवृत्ती घेऊ शकतो. पण त्याच्याबाबत असा विचार करण सुद्धा गुन्हा आहे. कारण वयाच्या 42 व्या वर्षी धोनीने मैदानावर अशी करामात दाखवली की, पाहणारे हैराण झाले. आयपीएल 2024 मध्ये CSK आणि गुजरात टायटन्समध्ये सातवा सामना झाला. या मॅचमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध धोनीने एका कमालीची कॅच पकडली. ही कॅच इतकी जबरदस्त होती की, पाहणारे धोनीचे फॅन झाले.
ऑलराउंडर डॅरेल मिचेलच्या चेंडूवर धोनीने ही शानदार कॅच पकडली. मिचेलच्या चेंडूवर विजय शंकरने ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटच्या कडेला लागून स्लीपच्या दिशेला गेला. त्यावेळी धोनीने उजव्या बाजूला झेप घेऊन एक शानदार कॅच पकडली. अशा प्रकारच्या कॅचमध्ये रिएक्शन टाइम फार कमी असतो. पण धोनीने हा झेल सोपा बनवला. धोनीने ही कॅच पकडण्यासाठी 2.27 मीटर लांब डाइव्ह मारली. 42 वर्षाच्या खेळाडूसाठी ही मोठी झेप आहे. धोनीचा फिटनेस इतका कमालीचा आहे की, त्याला ही कॅच पकडताना कुठलीही अडचण आली नाही.
𝗩𝗶𝗻𝘁𝗮𝗴𝗲 𝗠𝗦𝗗 😎
An excellent diving grab behind the stumps and the home crowd erupts in joy💛
Head to @JioCinema and @StarSportsIndia to watch the match LIVE#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/n5AlXAw9Zg
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
ऋतुराजला धोनीची मदत
धोनीने हा सीजन सुरु होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सची कॅप्टनशिप सोडली. सध्या ऋतुराज गायकवाडकडे टीमची कॅप्टनशिप आहे. तो चांगल्या पद्धतीने टीमच नेतृत्व करतोय. धोनी सुद्धा त्याला मदत करतोय. पण धोनीचा हा शेवटचा सीजन असल्याची चर्चा आहे. काल चेन्नई सुपर किंग्सने चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स विरुद्धचा सामना 63 धावांनी जिंकला. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 6 गडी गमवून 206 धावा केल्या. विजयासाठी 207 धावांचं लक्ष्य दिलं होतं. गुजरात टायटन्सच्या टीमला 20 षटकात 148 धावाच करता आल्या.