CSK vs GT Playing XI : हार्दिक विरुद्ध धोनी, पहिल्या मॅचमध्ये कुठल्या खेळाडूंना मिळणार संधी?

CSK vs GT Best Playing 11: मागच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम 9 व्या नंबरवर होती. तेच गुजरात टायटन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर होती. गुजरातच्या टीमने आयपीएल डेब्युमध्येच जेतेपदाला गवसणी घातली होती.

CSK vs GT Playing XI : हार्दिक विरुद्ध धोनी, पहिल्या मॅचमध्ये कुठल्या खेळाडूंना मिळणार संधी?
Gujarat Titans
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:41 AM

CSK vs GT Best Playing 11: IPL 2023 ची सुरुवात आज 31 मार्चपासून होत आहे. लीगमधील पहिला सामना विद्यमान चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये होणार आहे. विजयाने सुरुवात करण्याचा दोन्ही टीम्सचा प्रयत्न असेल. मागच्या सीजनमध्ये चेन्नई टीमची सुरुवात खूप खराब झाली होती. चेन्नईच्या टीमने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले होते. तेच गुजरात टायटन्स टीमने 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला होता. मागच्या सीजनमध्ये दोन्ही टीम्समध्ये दोन सामने झाले. या दोन्ही मॅच गुजरातने जिंकल्या.

मिनी ऑक्शनमध्ये कोट्यवधी खर्चून विकत घेतले हे खेळाडू?

मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन झालं. या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्सने 16.25 कोटी रुपये खर्च करुन बेन स्टोक्सला विकत घेतलं. तेच सीएसकेने न्यूझीलंडचा खेळाडू काइल जेमिसनवर 1 कोटी रुपये खर्च केले. गुजरात टायटन्सने सुद्धा काही खेळाडूंवर भरपूर पैसा खर्च केला. त्याने केन विलियमसनला 2 कोटी रुपयांच्या बेस प्राइसला विकत घेतलं. त्याशिवाय शिवम मावीवर 6 कोटी रुपये खर्च केले. नव्या खेळाडूंच्या समावेशामुळे दोन्ही टीम्स प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसेल.

गुजरात कोणाला देणार संधी?.

गुजरात टायटन्सकडे शुभमन गिलच्या रुपात आक्रमक फलंदाज आहे. मॅथ्यू वेडच्या रुपात त्याला चांगला जोडीदार मिळू शकतो. वेड टीममध्ये विकेटकीपरची भूमिका बजावले. तिसऱ्या नंबरवर अनुभवी केन विलयमसन दिसू शकतो. हार्दिक पंड्या आणि राहुल तेवतिया ऑलराऊंडर असून ते फिनिशरची भूमिका सुद्धा चोख वठवतात. गोलंदाजी विभागात राशिद खान, शिवम मावी, साई किशोर, अल्जारी जोसेफ, यश दयाल आहेत.

चेन्नईच्या टीममध्ये काय बदल होतील?

चेन्नई सुपर किंग्सकडे ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉनवेच्या रुपात चांगली सलामीवीरांची जोडी आहे. मागच्या सीजनमध्ये गायकवाड काही खास करु शकला नाही. पण सीएसकेचा त्याच्यावर विश्वास आहे. तिसऱ्या नंबरवर मोइन अली आहे. अंबाती रायडू चौथ्या नंबरवर येईल. बेन स्टोक्सच सुद्धा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणं निश्चित आहे. रवींद्र जाडेजा आणि शिवम दुबे ऑलराऊंडरच्या भूमिकेत दिसतील. गोलंदाजी विभागात दीपक चाहर, सिमरनजीत सिंह आणि महीश तीक्ष्णा टीममध्ये आहेत.

गुजरात टायटन्सची बेस्ट Playing XI: शुभमन गिल, मॅथ्यू वेड, अभिनव मनोहर, हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, शिवम मावी, आर साई किशोर, अल्जारी जोसफ, यश दयाल. चेन्नई सुपरकिंग्स बेस्ट Playing XI: ऋतुराज गायकवाड़, डेवन कॉनवे, मोईन अली, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कॅप्टन), शिवम दुबे, दीपक चाहर, सिमरजीत सिंह आणि महीश तीक्षणा.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.