IPL 2021 Final LIVE Score, CSK vs KKR: चेन्नईचं सुपर कमबॅक, केकेआरला धुळ चारत मिळवला विजय, ट्रॉफीही केली नावावर
कोरोनाच्या संकटामुळे स्थगितीच्या अडणीत सापडल्यानंतरही अखेर आयपीएलचं 14 वं पर्व पार पडलं. आज यंदाच्या पर्वाचा अंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या दोघांच्यात पार पडला ज्यात चेन्नईने केकेआरवर 27 धावांनी विजय मिळवला.
IPL 2021 Final :जगातील अव्वल दर्जाची क्रिकेट लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग 2021 ची आज अखेर सांगता झाली आहे. स्पर्धेतील अंतिम सामना कोलकाता नाइट राइडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) या दोघांमध्ये दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडला. एका क्षणी चुरशीचा होत असलेला सामना चेन्नईने काही वेळात फिरवत आपल्या नावे केला आहे. या विजयासह धोनीच्या टोळीने चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं . तर केकेआरचं तिसऱ्यांदा विजयाचं स्वप्न अधुरं राहिलं आहे.
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी कऱण्याचा निर्णय़ घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजानी दमदार फलंदाजी करत 192 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईचा सलामीवीर फाफ डुप्लेसीसच्या 86 धावांच्या जोरावर ही धावसंख्या चेन्नईने उभी केली. ज्यानंतर केकेआरचे सलामीर गिल आणि अय्यर यांनी उत्तम सुरुवात केली 91 धावांपर्यंत एकही विकेट नसताना नंतर मात्र एक एक करत सर्व गडी बाद होत गेले. अखेर चेन्नईच्या गोलंदाजानी अप्रतिम गोलंदाजी करत संघाला 27 धावांनी विजय मिळवून दिला.
LIVE NEWS & UPDATES
-
CSK vs KKR: चेन्नईचा 27 धावांनी विजय
अखेरच्या काही षटकात चेन्नईच्या गोलंदाजानी सुपर कमबॅक करत केकेआरच्या फलंजाना रांगेत तंबूत धाडलं आणि सामना 27 धावांनी जिंकला.
-
CSK vs KKR: केकेआरचा कर्णधार बाद, चेन्नई विजयाच्या उंबरठ्यावर
केकेआरची अखेरची आशा असणारा कर्णधार इयॉन मॉर्गनही बाद झाला आहे. आता केवळ 2 विकेट हातात असून त्यांना 21 चेंडूत 68 धावांची गरज आहे.
-
-
CSK vs KKR: राहुल त्रिपाठीही बाद
क्वॉलीफायरच्या सामन्यात सिक्स ठोकून संघाला विजय मिळवून देणारा राहुल आज सिक्स मारतानाच झेलबाद झाला. शार्दूलच्या चेंडूवर मोईनने त्याचा झेल घेतला.
-
CSK vs KKR: जाडेजाने एकाच षटकात घेतल्या 2 विकेट्स
केकेआरचा संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. संघाचा सहावा गडी शाकिबही शून्य धावांवर बाद झाला आहे. जाडेजानेच त्याला पायचीत केलं आहे.
-
CSK vs KKR: केकेआरचा निम्मा संघ तंबूत परत
नुकत्याच फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिकही खास कमाल करु शकला नाही. जाडेजाच्या चेंडूवर रायडूने त्याला 9 धावांवर बाद केलं आहे.
-
-
CSK vs KKR: शुभमनही आऊट!
नुकतचं अर्धशतक पूर्ण झालेला शुभमन गिल रचनात्मक शॉट खेळताना बाद झाला आहे. दीपक चहरने त्याची विकेट टीपली आहे.
-
CSK vs KKR: शुभमनचं अर्धशतक पूर्ण
केकेआर संघाचे एका मागोमाग एक विकेट जात असताना एक दिलासादायक गोष्ट घडली आहे. त्याचा सलामीवीर शुभमनने नुकतं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
CSK vs KKR: केकेआरचा तिसरा गडीही बाद
केकेआरने उत्तम सुरुवात केल्यानंतर आता मात्र त्यांचे खेळाडू एकामागोमाग एक बाद होत आहेत. एकाच षटकात अय्यर आणि राणा बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात सुनील नारायणही 2 धावा करुन बाद झाला आहे. हेजलवुडच्या चेंडूवर जाडेजाने त्याचा झेल घेतला आहे.
-
CSK vs KKR: शार्दूलची कमाल, राणा शून्यावर बाद
चेन्नईकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शार्दूलने पुन्हा एकदा संघाला सावरलं आहे. त्याने 11 व्या ओव्हरमध्ये अय्यर आणि राणा यांना बाद केलं आहे. राणा शून्य धावांवर फाफच्या हाती झेलबाद झाला आहे.
-
CSK vs KKR: व्यंकटेश अय्यर बाद
कोलकात्याचा पहिला गडी अखेर तंबूत परतला आहे. सलामीवीर व्यंकटेश अय्यर 50 धावा करुन बाद झाला आहे. शार्दूलच्या चेंडूवर जाडेजाने त्याची अप्रतिम अशी कॅच घेतली आहे.
-
CSK vs KKR: शुभमनला जीवदान
शुभमन गिलने जाडेजाच्या 10 व्या षटकात ठोकलेल्या उत्तुंग चेंडूला सीएसकेच्या रायडूने पकडलं खरं पण चेंडू मैदानात वर असलेल्या स्पायडर कॅमला लागल्याने बॉल अवैध पकडून त्याला नाबाद करार देण्यात आलं.
-
CSK vs KKR: व्यंकटेश अय्यरचं अर्धशतक
केकेआरचा सलामीवीर आणि पहिलंच पर्व खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने चौैथं अर्धशतक ठोकलं आहे. त्याने 31 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार खेचत 50 धावा पूर्ण केल्या आहेत.
-
CSK vs KKR: केकेआरची दमदार सुरुवात
केकेआर संघाने दमदार सुरुवात केली असून पावरप्लेच्याअंती अर्थात 6 ओव्हरनंतर संगाने 55 धावा केल्या आहेत.
-
CSK vs KKR: गिलने चौकार मारत केली सुरुवात
केकेआरची फलंदाजी सुरु होताच पहिल्या चेंडूवर सलामीवीर शुभमन गिलने चौकार लगावला आहे.
-
CSK vs KKR: फाफच्या 86 धावा, चेन्नईची 192 धावापर्यंत मजल
चेन्नईची फलंदाजी समाप्त झाली असून सलामीवीर फाफने 86 धावा ठोकल्यामुले संघाने 192 धावांपर्यंत मजल मारली आहे.
-
CSK vs KKR: मोईनच्या बॅटमधून दोन षटकार
17 व्या षटकात मोईन अलीने दोन षटकार खेचले आहेत. त्यामुळे 17 ओव्हरनंतर चेन्नईचा स्कोर 153 झाला आहे.
-
CSK vs KKR: रॉबीन उथप्पा बाद
दुसऱ्या स्थानावर येत चेन्नईच्या रॉबीनने धडाकेबाज फलंदाजी करायला सुरुवात केली. 14 चेंडूत 3 षटकार ठोकत त्याने 31 धावा केल्या. पण सुनीलच्या फिरकीच्या जादूवर तो पायचीत झाला.
-
CSK vs KKR: षटकार ठोकत फाफचं अर्धशतक
चेन्नईचा सलामीवीर फाफने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं आहे. त्याने 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
-
CSK vs KKR: ऋतुराज बाद
चेन्नईला पहिला झटका बसला असून सलामीवीर ऋतुराज गायकवाड 32 धावा करुन बाद झाला आहे. केकेआरच्या नारायणच्या चेंडूवर शिवम मावीने त्याचा झेल घेतला आहे.
-
CSK vs KKR: चेन्नईचं अर्धशतक पूर्ण
पावरप्लेच्याअंती (6 ओव्हर) चेन्नई सुपरकिंग्सने 50 धावा पूर्ण केल्या असून त्यांचा एकही गडी बाद झालेला नाही.
-
CSK vs KKR: चेन्नईचे सलामीवीर लयीत
चेन्नई सुपरकिंग्सचे सलामीवीर गायकवाड आणि फाफ चांगल्या लयीत असून 4 ओव्हरनंतर त्यांचा स्कोर 34 झाला आहे.
-
CSK vs KKR: सामन्यातील पहिला चौकार ऋतुराजच्या बॅटमधून
या महामुकाबल्यातील पहिला चौकार चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून आला आहे.
-
CSK vs KKR: चेन्नईचे सलामीवीर मैदानात
केकेआरने प्रथम गोलंदाजी घेतल्याने चेन्नईकडे प्रथम फलंदाजी आली आहे. त्यामुळे फलंदाजीसाठी चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस मैदानात आले आहेत.
-
आतापर्यंत CSK vs KKR
आयपीएलच्या इतिहासात कोलकाता आणि चेन्नई हे संघ 25 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारडं कमालीचा जड असून त्यांनी 25 पैकी 16 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता केवळ 8 वेळाच विजय मिळवू शकला असून एक सामना अनिर्णीत सुटला आहे.
-
CSK अंतिम 11
फाफ डुप्लेसी, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, जोश हेजलवुड, दीपक चाहर.
-
KKR अंतिम 11
इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शाकिब अल् हसन, सुनील नारायण, लॉकी फर्ग्यूसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती.
-
KKR vs RCB: चेन्नईच्या संघाकडे प्रथम फलंदाजी
सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजी निवडली आहे. त्यामुळे चेन्नईचे खेळाडू प्रथम फलंदाजी करतील.
Published On - Oct 15,2021 7:02 PM