CSK vs MI IPL 2023 Highlights : चेन्नईचा मुंबईवर आरामात विजय

| Updated on: May 06, 2023 | 7:17 PM

Chennai Super Kings vs Mumbai Indians IPL 2023 Score in Marathi : चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये होणाऱ्या सामन्याची क्रिकेटप्रेमींना उत्सुक्ता आहे. आयपीएलमध्ये नेहमीच या दोन प्रतिस्पर्ध्यांमधील सामना क्रिकेटची रंगत वाढवतो.

CSK vs MI IPL 2023 Highlights : चेन्नईचा मुंबईवर आरामात विजय
CSK vs MI

चेन्नई : आज डबल हेडर सामन्याचा दिवस आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये मॅच झाली. चेन्नई येथे ही मॅच झाली. आयपीएलमधील हा 49 वा सामना होता. चेन्नईने मुंबई इंडियन्सवर आरामात 6 विकेट राखून विजय मिळवला. मुंबईने पहिली बॅटिंग केली. चेन्नईला विजयासाठी 140 रन्सच टार्गेट दिलं होतं. चेन्नईने 17.4 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं.

मुंबई इंडियन्सने मागच्या सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला होता. मुंबईने 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. चालू सीजनच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला जुना हिशोब चुकता करण्याची संधी होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 May 2023 07:04 PM (IST)

    CSK vs MI Live Score : चेन्नईचा मुंबईवर विजय

    चेन्नईने मुंबई इंडियन्सवर 6 विकेट राखून विजय मिळवला. एमएस धोनीने चेन्नईच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेलं 140 धावांच टार्गेट चेन्नईने 17.4 ओव्हरमध्ये पार केलं.

  • 06 May 2023 07:00 PM (IST)

    CSK vs MI Live Score : चेन्नईला विजयासाठी 8 धावांची गरज

    चेन्नईच्या 4 बाद 132 धावा झाल्या आहेत. शिवम दुबे (19) आणि एमएस धोनी (1) रन्सवर खेळतोय. चेन्नईला विजयासाठी 8 धावांची गरज आहे.

  • 06 May 2023 06:40 PM (IST)

    CSK vs MI Live Score : शिवम दुबेने मारले 2 सिक्स

    राघव गोयल टाकत असलेल्या 14 व्या ओव्हरमध्ये शिवम दुबेने दोन सिक्स मारले. चेन्नईची 3 बाद 119 स्थिती आहे. विजयासाठी 36 चेंडूत 21 धावांची गरज आहे.

  • 06 May 2023 06:35 PM (IST)

    CSK vs MI Live Score : कडक SIX, पण रायुडू लगेच OUT

    चेन्नईच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. अंबाती रायुडूने ट्रिस्टन स्टब्सला सिक्स मारुन चेन्नईसाठी धावांच शतक पूर्ण केलं. पण त्यानंतर रायुडू लगेच बाद झाला. रायुडूने 11 चेंडूत 12 धावा केल्या. 13 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 3 बाद 105 धावा झाल्या आहेत.

  • 06 May 2023 06:30 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला विकेटची गरज

    12 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 2 बाद 96 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे (35) आणि अंबाती रायुडू (5) धावांवर खेळतोय.

  • 06 May 2023 06:25 PM (IST)

    CSK vs MI Live Score : कॉनवे-रायुडूची जोडी मैदानात

    11 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. डेवॉन कॉनवे (29) आणि अंबाती रायुडूची (3) जोडी मैदानात आहे. चेन्नईच्या 2 बाद 88 धावा झाल्या आहेत. पियुष चावलाच्या या ओव्हरमध्ये 4 धावा निघाल्या.

  • 06 May 2023 06:20 PM (IST)

    CSK vs MI Live Score : 10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    10 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. डेवॉन कॉनवे (27) आणि अंबाती रायुडूची (1) जोडी मैदानात आहे. चेन्नईच्या 2 बाद 84 धावा झाल्या आहेत.

  • 06 May 2023 06:16 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला मिळाली चेन्नईची महत्वाची विकेट

    मुंबई इंडियन्सला अजिंक्य रहाणेच्या रुपाने चेन्नईची महत्वाची विकेट मिळाली आहे. 21 धावांवर खेळणाऱ्या अजिंक्यला पियुष चावलाने LBW आऊट केलं. त्याने 1 फोर, 1 सिक्स मारला. 9 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 2 बाद 81 धावा झाल्या आहेत.

  • 06 May 2023 06:08 PM (IST)

    CSK vs MI Live Score : कॉनवे-रहाणेची जोडी मैदानात

    8 ओव्हरअखेरीस चेन्नईच्या 1 बाद 73 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 24 आणि अजिंक्य रहाणे 14 धावांवर खेळतोय.

  • 06 May 2023 06:01 PM (IST)

    CSK vs MI Live Score : चेन्नईची चांगली सुरुवात

    पावरप्लेमध्ये 1 विकेट गमावून चेन्नईने चांगली सुरुवात केली आहे. चेन्नईच्या 6 ओव्हर्समध्ये 1 बाद 55 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे 18 आणि अजिंक्य रहाणे 7 धावांवर खेळतोय.

  • 06 May 2023 05:54 PM (IST)

    CSK vs MI Live Score : चेन्नईची पहिली विकेट

    ओपनर ऋतुराज गायकवाडच्या रुपाने चेन्नईची पहिली विकेट गेली आहे. त्याने 16 बॉलमध्ये 30 धावा करताना 4 फोर, 2 सिक्स मारले. पियुष चावलाने इशान किशनकरवी झेलबाद केलं. 5 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या 1 बाद 50 धावा झाल्या आहेत. डेवॉन कॉनवे आणि अजिंक्य रहाणेची जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 05:50 PM (IST)

    CSK vs MI Live Score : चेन्नईची दमदार सुरुवात

    चेन्नई सुपर किंग्सने दमदार सुरुवात केली आहे. 4 ओव्हर अखेरीस चेन्नईच्या बिनबाद 46 धावा झाल्या आहेत. ओपनर ऋतुराज गायकवाड 15 चेंडूत 30 आणि डेवॉन कॉनवे 10 चेंडूत 14 धावांवर खेळतोय.

  • 06 May 2023 05:13 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईकडून नेहल एकटा लढला, चेन्नईला विजयासाठी इतक्या धावांच टार्गेट

    20 व्या ओव्हरमध्ये माथीशा पाथीराणाने मुंबईला 7 वा झटका दिला. अर्शद खानला त्याने गायकवाडकरवी झेलबाद केलं. अर्शद खानने 1 रन्स केला. याच ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्टब्सचा 20 रन्सवर विकेट गमावला. मुंबईने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 139 धावा केल्या. मुंबईने चेन्नईला विजयासाठी 140 धावांच लक्ष्य दिलं आहे. मुंबईकडून एकटा नेहल वढेरा लढला. त्याने 51 चेंडूत 64 धावा केल्या. यात 8 फोर आणि 1 सिक्स आहे. चेन्नईकडून पाथीराणाने सर्वाधिक 3 विकेट काढल्या.

  • 06 May 2023 05:06 PM (IST)

    CSK vs MI Live Score : टीम डेविड आज स्वस्तात OUT

    मुंबई इंडियनस्चा स्फोटक फलंदाज टीम डेविड स्वस्तात बाद झाला. 19 व्या ओव्हरमध्ये तुषार देशपांडेने त्याला गायकवाडकरवी झेलबाद केलं. टिम डेविडने 4 चेंडूत 2 रन्स केल्या. 19 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 6 बाद 134 धावा झाल्या आहेत.

  • 06 May 2023 05:00 PM (IST)

    CSK vs MI Live Score : दमदार बॅटिंग करणारा नेहल वढेरा OUT

    नेहल वढेराच्या रुपाने मुंबई इंडियन्सची 5 वी विकेट गेली आहे. नेहल वढेराने 51 चेंडूत 64 धावा केल्या. त्याने 8 फोर आणि 1 सिक्स मारला. माथीशा पाथीराणाने यॉर्कर चेंडूवर नेहलला बोल्ड केलं. 18 ओव्हर अखेरीस मुंबईची स्थिती 124/5 आहे. टीम डेविड (1) आणि स्टब्सची (13) जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 04:54 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला मिळाली मोठी ओव्हर

    17 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 4 बाद 122 धावा झाल्या आहेत. वढेरा (60) आणि स्टब्स (12) धावांवर खेळतोय. रवींद्र जाडेजाच्या या ओव्हरमध्ये मुंबईला 16 धावा मिळाल्या.

  • 06 May 2023 04:52 PM (IST)

    CSK vs MI Live Score : नेहल वढेराची हाफ सेंच्युरी

    17 व्या ओव्हरमध्ये नेहल वढेराने हाफ सेंच्युरी पूर्ण केली आहे. आयपीएलमधील त्याची ही पहिली हाफ सेंच्युरी आहे. 46 चेंडूत त्याने 51 धावा केल्या. त्याने 6 फोर आणि 1 सिक्स मारला.

  • 06 May 2023 04:49 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईच्या 100 धावा पूर्ण

    16 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. मुंबई इंडियन्सने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबईची स्थिती 106/4 आहे. नेहल वढेरा (49) आणि स्टब्स (11) धावांवर खेळतोय.

  • 06 May 2023 04:45 PM (IST)

    CSK vs MI Live Score : 15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    15 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झालाय. मुंबई इंडियन्सला आता फटकेबाजीची आवश्यकता आहे. मुंबईच्या 93/4 अशी स्थिती आहे. नेहल वढेरा 41 आणि स्टब्स 6 रन्सवर खेळतोय.

  • 06 May 2023 04:38 PM (IST)

    CSK vs MI Live Score : नेहल वढेराची झुंजार बॅटिंग

    14 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 4 बाद 86 धावा झाल्या आहेत. नेहल वढेरा (39) आणि ट्रिस्टन स्टब्स (5) रन्सवर खेळतोय.

  • 06 May 2023 04:34 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला धावगती वाढवण्याची गरज

    13 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 4 बाद 79 धावा झाल्या आहेत. नेहल वढेरा (32) आणि ट्रिस्टन स्टब्स (5) रन्सवर खेळतोय.

  • 06 May 2023 04:31 PM (IST)

    CSK vs MI Live Score : 12 ओव्हर्सचा खेळ पूर्ण

    12 ओव्हर अखेरीस मुंबईच्या 4 बाद 74 धावा झाल्या आहेत. नेहल वढेरा (31) आणि ट्रिस्टन स्टब्स (2) रन्सवर खेळतोय.

  • 06 May 2023 04:27 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला चौथा झटका

    अखेर मुंबई इंडियन्सला चौथा धक्का बसलाय. रवींद्र जाडेजाने चेन्नईला महत्वाची विकेट काढून दिली. जाडेजाने सूर्यकुमारला 26 रन्सवर बोल्ड केलं. 22 चेंडूत 26 रन्स करताना सूर्याने 3 चौकार मारले. 11 ओव्हर अखेरीस मुंबईची स्थिती 71/4 आहे.

  • 06 May 2023 04:23 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईची हालत खराब

    मुंबईची हालत खराब. 10 ओव्हर्सनंतर मुंबईच्या 3 बाद 64 धावा आहेत. सूर्यकुमार यादव (26) आणि नेहल वढेराची (22) जोडी मैदानात आहे. सूर्यकुमार-नेहलमध्ये 50 रन्सची भागीदारी झाली आहे.

  • 06 May 2023 04:15 PM (IST)

    CSK vs MI Live Score : मुंबईला धावगती वाढवण्याची गरज

    9 ओव्हर अखेरीस मुंबई इंडियन्सच्या 3 बाद 59 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव (22) आणि नेहल वढेराची (21) जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 04:12 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईच्या 50 धावा पूर्ण

    8 ओव्हर अखेरीस मुंबई इंडियन्सच्या 3 बाद 55 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव (20) आणि नेहल वढेराची (19) जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 04:08 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईला धावांची गरज

    7 ओव्हर अखेरीस मुंबई इंडियन्सच्या 3 बाद 44 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव (15) आणि नेहल वढेराची (14) जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 04:04 PM (IST)

    CSK vs MI Live Score : पावरप्लेच्या 6 ओव्हर्स पूर्ण

    सुरुवातीलाच 3 विकेट गेल्यामुळे मुंबई इंडियन्सला पावरप्लेचा फायदा उचलता आला नाही. मुंबई इंडियन्सच्या 6 ओव्हरमध्ये 3 बाद 34 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव (13) आणि नेहल वढेराची (8) जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 03:59 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईची टीम अडचणीत

    5 ओव्हर अखेरीस मुंबई इंडियन्सच्या 3 बाद 24 धावा झाल्या आहेत. दीपक चाहरने चेन्नईकडून 5 वी ओव्हर टाकली. नेहल वढेरा 7 आणि सूर्यकुमार यादवची 4 जोडी मैदानात आहे. या ओव्हरमध्ये फक्त 5 रन्स आल्या.

  • 06 May 2023 03:54 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : सूर्यकुमार यादव मैदानात

    चेन्नईकडून तृषार देशपांडेने चौथी ओव्हर टाकली. 4 ओव्हर अखेरीस मुंबईची स्थिती 3 बाद 19 धावा आहे. नेहल वढेरा 2 आणि सूर्यकुमार यादव 4 ची जोडी मैदानात आहे.

  • 06 May 2023 03:50 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईला तिसरा झटका

    मुंबई इंडियन्स संकटात आहे. कॅमरुन ग्रीन, इशान किशन पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा तंबूत परतला आहे. दीपक चाहरनेच रोहित शर्माला जाडेजाकरवी झेलबाद केलं. रोहित शर्माला 3 चेंडूत भोपळाही फोडता आला नाही. दीपक चाहरने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या. 3 ओव्हरनंतर मुंबईची स्थिती 3 बाद 16 धावा आहे.

  • 06 May 2023 03:46 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईला दुसरा झटका, दीपक चाहरने मिळवून दिलं यश

    मुंबईला दुसरा झटका बसलाय. चेन्नईकडून दीपक चाहरने तिसरी ओव्हर टाकली. त्याने ओपनर इशान किशनला तीक्ष्णाकरवी कॅचआऊट केलं. मुंबईच्या 2 बाद 14 धावा झाल्या आहेत. इशानने 9 चेंडूत 7 धावा केल्या. आता कॅप्टन रोहित शर्मा आणि नेहल वढेरा मैदानात आहे.

  • 06 May 2023 03:41 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईला पहिला झटका

    मुंबईला पहिला झटका बसलाय. चेन्नईकडून तृषार देशपांडेने दुसरी ओव्हर टाकली. त्याने ओपनर कॅमरुन ग्रीनला क्लीन बोल्ड केलं. मुंबईच्या 1 बाद 13 धावा झाल्या आहेत. कॅंमरुन ग्रीनने 4 चेंडूत 6 धावा केल्या. इशान किशन 7 आणि रोहित शर्मा आता क्रीजवर आलाय.

  • 06 May 2023 03:37 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबई इंडियन्सने सुरुवातीलाच चेन्नईला धक्का दिला आहे.

    मुंबई इंडियन्सने सुरुवातीलाच चेन्नईला धक्का दिला आहे. आज कॅप्टन रोहित शर्मा ओपनिंगला आलेला नाही. कॅमरुन ग्रीन आणि इशान किशन ओपनिंगला आले आहेत.

  • 06 May 2023 03:36 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईची चांगली सुरुवात

    चेन्नईकडून दिपक चाहरने पहिली ओव्हर टाकली. मुंबईने बिनबाद 10 धावा केल्या आहेत. मुंबईने पहिल्या ओव्हरमध्ये दोन फोर मारेल.

  • 06 May 2023 03:31 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबई इंडियन्सची सुरुवातीची प्लेइंग इलेवन

    रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल

  • 06 May 2023 03:15 PM (IST)

    CSK vs MI, Live Score : मुंबईच्या टीमममध्ये 2 बदल

    मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये 2 बदल करण्यात आले आहेत. कुमार कार्तिकेयला बाहेर करण्यात आलं असून राघव गोयल डेब्यु करत आहे. तिलक वर्माला दुखापत झालीय. त्याच्याजाही ट्रिस्टन स्टब्सला संधी दिलीय.

  • 06 May 2023 03:05 PM (IST)

    CSK vs MI Live Score : धोनीच्या चेन्नईने टॉस जिंकला

    चेन्नईचा कॅप्टन एमएस धोनीने टॉस जिंकला आहे. त्याने पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सची टीम पहिली बॅटिंग करणार आहे.

  • 06 May 2023 03:00 PM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज कर्नाटकच्या यमकनमर्डी मध्ये सभा

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज कर्नाटकच्या यमकनमर्डी मध्ये सभा

    काँग्रेस उमेदवार सतीश जारकिहोळ यांच्या प्रचारासाठी राहुल गांधीची सभा

    राहुल गांधींच व्यासपीठावर आगमन

    थोड्याच वेळात राहुल गांधी जनतेला संबोधित करणार

  • 06 May 2023 03:00 PM (IST)

    डोंबिवलीत फ्लॅटमध्ये आढळला 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह

    डोंबिवलीत फ्लॅटमध्ये आढळला 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह,

    अनिता पाटील असं या वृद्ध महिलेचं नाव

    मयत डोंबिवली पूर्वेकडील घारीवली परिसरात अर्जुन एम्पायर इमारतीमध्ये राहणार असून चोरीच्या उद्देशाने वृद्ध महिलेची हत्या झाल्याचा संशय

    मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सुरू केला तपास

  • 06 May 2023 02:59 PM (IST)

    जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणूक मतदान

    जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणूक मतदान

    जवाहर एज्युकेशन सोसायसाठी मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठापनाला

    तेरा वर्षानंतर पहिल्यांदाच मतदान धनंजय मुंडे यांनी बजावला पहिल्यांदाच मतदानाचा हक्क

    कोण बाजी मारणार याच्याकडेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मतमोजणी रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून

  • 06 May 2023 02:57 PM (IST)

    माथेरानच्या फुलराणीने आदित्य ठाकरेंनी केला प्रवास

    माथेरानच्या फुलराणीने आदित्य ठाकरेंनी केला प्रवास

    युवासेना प्रमुख आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे आज माथेरान दौऱ्यावर आले होते. माथेरानमध्ये माथेरान हिल स्पोर्ट्स क्लबचं त्यांनी उद्घाटन केलं. तसंच माथेरानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी बक्षीस वितरण केलं. माथेरानमधील जिल्हा परिषद शाळेत हा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे माथेरानच्या फुलराणीने म्हणजेच मिनी ट्रेनने प्रवास करत माथेरानमध्ये दाखल झाले. माथेरानमधील कार्यक्रम संपवून आदित्य ठाकरे नंतर पुण्याकडे रवाना झाले.

  • 06 May 2023 02:52 PM (IST)

    चित्रा वाघ यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

    चित्रा वाघ यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

    अखेर उद्धव ठाकरेंच्या पोटातलं ओठावर आलं…ते ज्या कामात एक्सपर्ट आहे तेच बोलून दाखवलं.

    ज्या महाराष्ट्रानं तुम्हाला घडवलं तो छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करताय….?? तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा नाही तर पेटवायचाय….@OfficeofUT

    उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या आईशी गद्दारी करताय पण आम्ही तुमचे मनसुबे उधळून लावू.

    कर्तबगार गृहमंत्री @Dev_Fadnavis जी राज्याला लाभले आहेत. ज्यांनी तुमच्यासारख्या भल्याभल्यांना वठणीवर आणलंय…

  • 06 May 2023 02:44 PM (IST)

    कार्यकर्त्याला झाले अश्रू अनावर

    सांगली – महाराष्ट्रातल्या कोणत्याही विरोधकांची जयंत पाटील साहेबांना दृष्ट लागू नये, यासाठी मी पंढरपूरच्या पांडुरंगाचा बुक्का लावतो असे म्हणत जयंत पाटलांची भेट घेतल्यावर अमोल पाटील या कार्यकर्त्याला झाले अश्रू अनावर.

  • 06 May 2023 02:39 PM (IST)

    CSK vs MI Live Score : रोहित शर्मा बदलापूर पूर्ण करणार?

    28 दिवसांपूर्वी 8 एप्रिलला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला हरवलं होतं. आता सामना चेन्नईमध्ये आहे. रोहित शर्माकडे हिशोब चुकता करण्याची चांगली संधी आहे.

Published On - May 06,2023 2:37 PM

Follow us
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.