CSK vs MI Prediction Playing XI IPL 2022: मुंबई आपल्या स्टार खेळाडूला आराम देणार, चेन्नई जुनाच संघ उतरवणार

CSK vs MI Prediction Playing XI IPL 2022: CSK ने आपल्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी मोठया फरकाने विजय मिळवला होता. या सामन्यात जाडेजाच्या जागी शिवम दुबेला संधी देण्यात आली होती.

CSK vs MI Prediction Playing XI IPL 2022: मुंबई आपल्या स्टार खेळाडूला आराम देणार, चेन्नई जुनाच संघ उतरवणार
csk vs mi Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 7:56 PM

मुंबई: आयपीएलमध्ये (IPL) नेहमी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या (CSK vs MI) सामन्यावर सर्वाधिक नजर असते. यंदाच्या सीजनमध्ये दोन्ही संघांना चमकदार कामगिरी करता आलेली नाही. पण लीगच्या इतिहासातील दोन्ही यशस्वी संघ आहेत. पॉंइंटस टेबलमध्ये मुंबई आणि चेन्नई हे दोन्ही संघ तळाला आहेत. मुंबईच, तर स्पर्धेतील आव्हान कधीच संपुष्टात आलय. चेन्नईचा संघ फक्त अपेक्षेवर आहे. त्यांचा प्लेऑफचा (Playoff) मार्ग खूपच खडतर आहे. गुरुवारी दोन्ही संघ भिडतील. त्यावेळी मुंबई चेन्नईला नमवून त्यांचही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणते की, CSK चं आव्हान अजून काही दिवस टिकून रहात, यावर सगळ्यांच्या नजरा असतील.

चेन्नईचा संघ या पुढच्या सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा शिवाय उतरणार आहे. जाडेजा दुखापतीमुळे मागच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे जाडेजा पुढचे सगळेच सामने खेळणार नसल्याची माहिती आहे.

चेन्नई काय बदल करेल?

CSK ने आपल्या मागच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी मोठया फरकाने विजय मिळवला होता. या सामन्यात जाडेजाच्या जागी शिवम दुबेला संधी देण्यात आली होती. चेन्नईच्या फलंदाजांनी अलीकडच्या सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं आहे. ड्वेन ब्राव्हो फिट झाल्यामुळे संघाची गोलंदाजी सुद्धा मजबूत झालीय. सीएसके या सामन्यासाठी संघात कुठला बदल करेल, याची शक्यता कमी वाटते.

पोलार्डला आराम मिळणार

मुंबई इंडियन्सला मागच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. टीमच्या गोलंदाजीत आता थोडीफार सुधारणा झालीय. जसप्रीत बुमराहने तर मागच्या सामन्यात कहर केला. त्याने आपल्या धारदार गोलंदाजीने केकेआरची वाट लावून टाकली. पण फलंदाजांनी निराश केलं. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. यंदा पॉइंटस टेबलमध्ये दोन्ही संघांनी खूपच खराब प्रदर्शन केलय. चेन्नईकडे फक्त नाममात्र अपेक्षा आहेत. आतापर्यंत चेन्नई आणि मुंबईचा सामना नेहमीच रोमांचक झाला आहे. मागच्या सामन्यात तर धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकून चेन्नईला विजय मिळवून दिला होता. पोलार्ड खराब फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला बाहेर बसवलं जाऊ शकतं.

CSK vs MI संभाव्य प्लेइंग – 11

चेन्नई – एमएस धोनी (कॅप्टन), डवेन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथाप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मुकेश चौधरी, महेश तीक्ष्णा, सिमरजीत सिंह,

मुंबई – रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, संजय वर्मा, टिम डेविड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, रायली मेरेडिथ, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह,

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.