CSK vs RCB IPL 2022: RCB चे प्लेयर्स दंडावर काळ्या पट्टया बांधून का खेळतायत?
CSK vs RCB IPL 2022: आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (CSK vs RCB) मध्ये सामना सुरु आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
मुंबई: आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (CSK vs RCB) मध्ये सामना सुरु आहे. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलमधील (IPL) हे दोन्ही बलाढ्य संघ असून यंदाच्या सीजनमध्ये पहिल्यांदाच आमने-सामने आले आहेत. त्यामुळे चाहते प्रचंड उत्साहात आहेत. RCB चा कॅप्टन फाफ डू प्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरसीबीच्या खेळाडुंनी आज दंडावर काळ्या पट्टया बांधल्या आहेत. आरसीबी टीममधील सदस्य हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन झाल्यामुळे या संघातील खेळाडू दंडावर काळया पट्टया बांधून खेळत आहेत. आरसीबीने या कृतीमधून खेळाडूं इतकेच त्यांचे कुटुंबीयही महत्त्वाचे असल्याचं दाखवून दिलं आहे. आयपीएलमध्ये टीमला फॅमिली प्रमाणे मानतात. आरसीबीने आज तेच केलं.
गोव्याच्या सुयश प्रभूदेसाईला संधी
हर्षल पटेल आजच्या सामन्यात खेळत नाहीय. बहिणीचं निधन झाल्यामुळे हर्षल रविवारी घरी परतला. हर्षल संघात कधी परतणार? त्या बद्दल अनिश्चितता आहे. त्याच्याजागी गोव्याच्या सुयश प्रभूदेसाईचा संघात समावेश करण्यात आला आहे. हर्षल पटेल आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू आहे. स्लोअर वन टाकण्यात तो माहीर आहे. गोलंदाजी करताना चेंडूची गती बदलण्याची कला त्याला चांगली अवगत आहे.
पर्पल कॅपचा मानकरी
यंदाच्या सीजनमध्येही तो आरसीबीसाठी दमदार कामगिरी करत होता. मागच्या सीजनमध्ये सर्वाधिक विकेट घेतल्या म्हणून त्याला पर्पल कॅप देण्यात आली होती. आता बहिणीचं निधन झाल्यामुळे त्याला घरी परताव लागलं आहे.
चेन्नईसाठी मॅच महत्त्वाची
चेन्नईसाठी आजच सामना महत्त्वाचा आहे. चेन्नईचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. सलग चार सामन्यात चेन्नईचा पराभव झाला आहे. दुसऱ्याबाजूला RCB चा संघ उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यांनी चारपैकी तीन सामने जिंकले आहेत.