CSK vs SRH IPL 2022: एमएस धोनी टॉस हरला, CSK चे दोन महत्त्वाचे खेळाडू अनफिट
CSK vs SRH IPL 2022: आयपीएलमधला हा 46 वा सामना आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर (MS Dhoni) असतील. कारण रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला.
मुंबई: IPL 2022 मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये (CSK vs SRH) सामना होत आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा डबल हेडरचा सामना आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर ही मॅच होत आहे. आयपीएलमधला हा 46 वा सामना आहे. आजच्या सामन्यात सर्वांच्या नजरा एमएस धोनीवर (MS Dhoni) असतील. कारण रवींद्र जाडेजाने (Ravindra jadeja) तडकाफडकी सीएसकेची कॅप्टनशिप सोडल्याचा निर्णय जाहीर केला. पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे चेन्नईचं नेतृत्व आलं आहे. त्यामुळे धोनी आज कशी कामगिरी करतो, त्याच्या कॅप्टनशिपखाली आज चेन्नई जिंकते का? याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. दरम्यान एमएस धोनी नाणेफेकीचा कौल हरला आहे. सनरायजर्स हैदराबादच्या केन विलियमसनने पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सीएसकेने आतापर्यंत आठ पैकी सहा सामने गमावले आहेत. फक्त दोन मॅचेसमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. प्लेऑफपर्यंत त्यांचा पोहोचण्याचा मार्ग खूपच खडतर आहे. त्यामुळे धोनी आज काही चमत्कार करतो का? याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
हैदराबाद संघाने एकूण 8 सामने खेळले असून त्यापैकी त्यांना 5 सामन्यात जिंकता आलंय. तर 3 सामन्यात हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागलाय. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये एकूण 10 पॉईंट्स मिळाले आहेत. तर नेट रेट 0.600 आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स पॉई्ट्स टेबलमध्ये नवव्या क्रामांकावर आहे.
CSK चे दोन महत्त्वाचे खेळाडू अनफिट
मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा गुजरात टायटन्सकडून पराभव झाला होता. मात्र तरीही त्यांनी संघात बदल केलेला नाही. सीएसकेला त्यांच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानावर उतराव लागतय. ड्वेन ब्राव्हो आणि शिवम दुबे अनफिट आहेत.
MS Dhoni Is An Emotion! ?
Thala is back to lead @ChennaiIPL once again!
Follow the match ? https://t.co/8IteJVPMqJ#TATAIPL | #SRHvCSK pic.twitter.com/XV9OAd1OB2
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
SRH ची प्लेइंग – 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन, शशांक सिंह, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मार्को जॅनसेन, टी.नटराजन, उमरान मलिक,
CSK ची प्लेइंग – 11 एमएस धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथाप्पा, ड्वेन कॉनवे, मिचेल सँटनर, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन प्रिटोरियस, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी आणि महीश तीक्ष्णा,