IPL 2022: ‘या’ चुकीची CSK ला मोठी शिक्षा, जड्डू अँड कंपनीच्या दयनीय स्थितीवर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य

आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) स्थिती खूपच नाजूक आहे. या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी एकाही सामन्यात या संघाला विजय मिळवता आलेला नाही.

IPL 2022: 'या' चुकीची CSK ला मोठी शिक्षा, जड्डू अँड कंपनीच्या दयनीय स्थितीवर रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य
Ravi Shastri - CSKImage Credit source: CS/Twitter
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 11:39 AM

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) स्थिती खूपच नाजूक आहे. या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी एकाही सामन्यात या संघाला विजय मिळवता आलेला नाही. सीएसकेसाठी आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात वाईट सुरुवात ठरली आहे. आयपीएल 2020 मध्ये हा संघ गुणतालिकेत तळाशी होता. मात्र तेव्हादेखील सीएसकेची अशी वाईट सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि आयपीएल 2022 मध्ये समालोचन करणारे रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी चेन्नई सुपर किंग्जच्या या दयनीय स्थितीवर एक मोठं वक्तव्य केलं आहे, जे कदाचित खरं आणि अचूक देखील आहे. त्यांचे वक्तव्य सीएसकेच्या (CSK) धोरणात्मक चुकांशी संबंधित आहे.

रवी शास्त्रींच्या मते, आयपीएलची यलो पलटण 15 व्या हंगामात मैदान उतरण्यापूर्वीच आपली ताकद गमावून बसली आहे. त्यांच्या रणनीतीतील चुकांचा हा परिणाम आहे. IPL 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जला मैदानाबाहेर मॅनेजमेंट स्तरावर झालेल्या एका मोठ्या चुकीची शिक्षा भोगावी लागत आहे.

डू प्लेसिस कर्णधार असता तर सीएसकेची अशी अवस्था झाली नसती : रवी शास्त्री

रवी शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, “जर एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा विचार करत होता, तर फ्रँचायझीने फाफ डू प्लेसिसला सोडायला नको होते. धोनीला त्याचा उत्तराधिकारी निवडायचा असेल तर डु प्लेसिस हा त्याचा प्रबळ दावेदार होता. शास्त्री म्हणाले, “जर फाफ डू प्लेसिस कर्णधार असता तर आयपीएल 2022 मध्ये सीएसकेची अशी अवस्था झाली नसती. त्याचबरोबर कर्णधार बनवलेला रवींद्र जडेजाही आपला खेळ मोकळेपणाने खेळू शकला. ,

IPL 2022 मध्ये कर्णधार डू प्लेसिस vs कर्णधार जाडेजा

IPL 2022 साठी चेन्नई सुपर किंग्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये फाफ डू प्लेसिसचे नाव नव्हते. जेव्हा आयपीएल 2022 च्या महा लिलावात त्याचं नाव पुकारलं तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला आपल्या संघात घेतलं. डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2022 मध्ये आरसीबीची आतापर्यंतची कामगिरी उत्तम झाली आहे. संघाने आतापर्यंत खेळलेले 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर CSK ने IPL 2022 मध्ये रवींद्र जडेजा याची कर्णधार म्हणून निवड केली. पण त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजयाची आस लागली आहे. आतापर्यंत चार सामन्यांत गतविजेत्या संघाने पराभवाचा सामना केला आहे.

इतर बातम्या

RCB vs MI, IPL 2022 : सूर्यकुमारने एकट्याने RCBला शांत केलं, अर्धशतक ठोकले

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाने मैदानात उतरताच केला मोठा विक्रम, धोनी आणि रैनाच्या यादीत समावेश

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.