ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? ‘युनिव्हर्स बॉस’कडून निवृत्तीचे संकेत

जगातील सर्वाद धडाकेबाज फलंदाजांमध्ये गणला जाणारा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने नुकतीच एक इच्छा व्यक्त केली आहे की, त्याला शेवटचा सामना त्याच्या घरी खेळायचा आहे.

ख्रिस गेल घरच्या मैदानावर अखेरचा सामना खेळणार? 'युनिव्हर्स बॉस'कडून निवृत्तीचे संकेत
Chris Gayle
Follow us
| Updated on: Nov 28, 2021 | 4:09 PM

मुंबई : जगातील सर्वाद धडाकेबाज फलंदाजांमध्ये गणला जाणारा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने नुकतीच एक इच्छा व्यक्त केली आहे की, त्याला शेवटचा सामना त्याच्या घरी खेळायचा आहे. 42 वर्षीय गेलची ही इच्छा पूर्ण होईल, असं वाटतंय. क्रिकेट वेस्ट इंडिज गेलला त्याच्या घरच्या मैदानावर निरोप देण्याबाबत विचार करण्यास तयार आहे. क्रिकबझ या वेबसाइटने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. वेबसाइटने कॅरिबियन बोर्डाचे अध्यक्ष रिकी स्केरिट यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “आम्हाला असे करायला आवडेल. ही चांगली कल्पना आहे. मात्र वेळ आणि स्वरूप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.” सीडब्ल्यूआयचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांनी संकेत दिले आहेत की, गेलचा शेवटचा सामना हा जानेवारीत आयर्लंडविरुद्धचा टी-20 सामना असू शकतो. (CWI likely to give Chris Gayle a farewell game in Jamaica)

ग्रेव्हने नुकतेच रेडिओ स्टेशनला सांगितले की, “आम्ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आयर्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळू. यानंतर सबिना पार्कवर टी-20 सामना होणार आहे. मला वाटतं प्रेक्षकांना सबिना पार्कवर येण्याची परवानगी दिली तर हा सामना गेलला त्याच्या घरी फेअरवेल देण्याची सर्वोत्तम संधी असू शकेल. रिकी यांनी मात्र आयर्लंडविरुद्धचा सामना गेलचा शेवटचा ठरू शकतो की नाही याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “सीईओने दिलेल्या विधानाचा मीडिया चुकीचा अर्थ लावत आहे.”

घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा

वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ख्रिस गेलने आयसीसी टी-20 विश्वचषक-2021 मध्ये घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो म्हणाला, “मी माझी निवृत्ती जाहीर केलेली नाही. पण जर त्यांनी (क्रिकेट बोर्डाने) मला जमैकामध्ये माझ्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याची संधी दिली तर मी तुमचे आभार मानू शकतो. गेलने वेस्ट इंडिजकडून 103 कसोटी, 301 एकदिवसीय आणि 79 टी-20 सामने खेळले आहेत. गेलने कसोटीत 7,214 धावा केल्या आहेत. त्याने वनडेमध्ये 10.480 धावा केल्या आहेत. त्याने T20 मध्ये 1899 धावा केल्या आहेत.

2019 मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर गेल म्हणाला होता की, हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल पण त्यानंतर त्याने आपला निर्णय बदलला. त्याने 14 ऑगस्ट 2019 रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्याने 5 सप्टेंबर 2014 रोजी बांगलादेशविरुद्ध किंग्सटाउन येथे कसोटीतील शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेट खेळलेला नाही.

इतर बातम्या

Gautam gambhir : भाजप खासदार गौतम गंभीर यांना तिसऱ्यांदा गंभीर धमकी, ISIS चे खबरी दिल्ली पोलिसांत?

IND vs NZ: तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने विकेटकीपर बदलला, ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त, भारत अडचणीत

IND vs NZ : भर मैदानात अश्विन आणि पंचांमध्ये वाद, कोच राहुल द्रविड थेट मॅच रेफरींच्या केबिनमध्ये

(CWI likely to give Chris Gayle a farewell game in Jamaica)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.