T20 WC : आधी धावांचा पाऊस पाडून सामना जिंकवला, मग हटके विधान करुन मनंही जिंकली, NZ च्या फलंदाजाची सर्वत्र चर्चा

टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) स्पर्धेत बुधवारी आपल्याला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. बुधवारी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या साम्यानत न्यूझीलंडने इंग्लंडवर मात केली आहे.

T20 WC : आधी धावांचा पाऊस पाडून सामना जिंकवला, मग हटके विधान करुन मनंही जिंकली, NZ च्या फलंदाजाची सर्वत्र चर्चा
Darly Mitchell
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 10:56 AM

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 (ICC T20 World Cup) स्पर्धेत बुधवारी आपल्याला पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. बुधवारी या स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना खेळवण्यात आला. या साम्यानत इंग्लंडचा संघ एका क्षणी सामना जिंकेल असेच वाटत होते. पण शेवटच्या काही षटकात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफान फलंदाजी करत विजय आपल्या नावे केला. यावेळी नाबाद 72 धावा ठोकणारा डॅरेल मिचेल हिरो ठरला आहे. तसेच निर्णायक क्षणी 11 चेंडूत 27 धावांची खेळी करुन सामना इंग्लंडच्या हातून हिरावणाऱ्या जेम्स निशमचंही सर्वत्र कौतुक होतंय. (Daryl Mitchell says I did not want to be person who creates controversey after adil rashid collision)

न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना 17 व्या षटकात इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद गोलंदाजी करत होता. त्याच्यासमोर न्यूझीलंडचा फलंदाज जिमी नीशम फलंदाजी करत होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर नीशमने पुढच्या बाजूला शानदार शॉट लगावला. दुसऱ्या टोकाला डॅरेल मिशेल होता. दोन्ही फलंदाजांनी धावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू रोखण्याचा प्रयत्न करणारा राशिद मध्ये आला. रशीद आणि मिशेल एकमेकांना धडकले. दरम्यान, नीशम आणि मिशेलने धावा घेण्यास नकार दिला. इथे वाद होऊ शकला असता पण मिशेलने ते टाळले, त्यात नीशमनेही त्याला साथ दिली. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नीशमने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर मिशेलनेही षटकार ठोकला.

या मुद्द्यावर मिशेलने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, मला वाद निर्माण करणारा खेळाडू व्हायचे नाही. तो म्हणाला, “मला वाटते की मी रशीदच्या मार्गात आलो आणि मला वाद निर्माण करणारा खेळाडू व्हायचे नव्हते. त्यामुळे धावा न घेतल्याने मी आनंदी होतो. आपण सर्व चांगल्या भावनेने खेळतो. आणि मला वाटले की माझी चूक आहे. त्यामुळे धाव घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पुन्हा सुरुवात केली तर बरे. मी नशीबवान होतो की त्यामुळे फारसा फरक पडला नाही.”

या सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी फलंदाजी करत 166 धावांची आश्वासक धावसंख्या गाठली. यावेळी जोस बटलरने 29 धावा करत चांगली सुरुवात केली. ज्यानंतर डेविड मलानने 42 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्याला मोईन अलीने नाबाद 52 धावांची फिनींशिंग देत संघाची धावसंख्या 166 पर्यंत पोहचवली.

मिचेलची संयमी खेळी, न्यूझीलंड विजयी

इंग्लंडने 167 धावांचे आव्हान दिल्यानंतर त्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर गप्टील आणि कर्णधार विल्यमसन स्वस्तात बाद झाल्यानंतर संघ फार मागे पडला. त्याचवेळी डेवॉन कॉन्वे आणि डेविड मलान यांनी एक उत्तम भागिदारी रचत संघाचा डाव सावरला. 46 धावा करुन कॉन्वे बाद होताच. जेम्स निशामने 27 धावांची फटकेबाजी करत विजय जवळ आणला. जो विजय डॅरेल मिचेलने नाबाद 72 धावांच्या खेळीसह चौकार मारुन न्यूझीलंडच्या नावे केला. न्यूझीलंडने 1 षटक आणि 5 गडी राखून विजय मिळवला आहे.

इतर बातम्या

T20 WC, Aus Vs Pak : सेमी फायनलच्या आधी पाकिस्तानवर संकट, चलतीचे दोन बॅटसमन फ्लूनं डाऊन, प्रॅक्टीसही टाळली

VIDEO: पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी भलत्याच गुर्मीत, LIVE मॅचदरम्यान भारतीय फलंदाजांची नकल करत उडवली खिल्ली

ICC T20 Rankings: श्रीलंकेचा वानिंदु हसारंगा पहिल्या स्थानावर कायम, ‘टॉप 10’ मध्ये एकही भारतीय नाही

(Daryl Mitchell says I did not want to be person who creates controversey after adil rashid collision)

महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.